चालताही येईना तरीही सिनेमा बघण्यासाठी थेट थिएटरमध्ये गेल्या आजीबाई, 'उत्तर'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा मनाला भिडणारा व्हिडीओ
By कोमल खांबे | Updated: December 31, 2025 10:08 IST2025-12-31T10:07:15+5:302025-12-31T10:08:07+5:30
'उत्तर' सिनेमाची कथा ही मायलेकामधील नात्यावर भाष्य करणारी आहे. आणि त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'उत्तर'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक मनाला भिडणारा व्हिडीओ समोर आला आहे.

चालताही येईना तरीही सिनेमा बघण्यासाठी थेट थिएटरमध्ये गेल्या आजीबाई, 'उत्तर'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा मनाला भिडणारा व्हिडीओ
'उत्तर' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात झाला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. 'उत्तर' सिनेमाची कथा ही मायलेकामधील नात्यावर भाष्य करणारी आहे. आणि त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'उत्तर'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक मनाला भिडणारा व्हिडीओ समोर आला आहे.
लेखक असलेल्या दिग्दर्शनात नुकतंच पदार्पण केलेल्या क्षितीज पटवर्धनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'उत्तर' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. थिएटरमध्ये एक आजीबाई दिसत आहेत. त्या आजीबाई वाकून चालत आहेत. चालताही येत नसलेल्या आजीबाई मराठी सिनेमा पाहण्यासाठी थेट कोल्हापुरातील थिएटरमध्ये गेल्या होत्या. त्यांना पाहून थिएटरमधील सगळेच आश्चर्यचकित झाले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्षितिज पटवर्धनही भारावून गेला आहे. व्हिडीओ शेअर करत क्षितिज पटवर्धन म्हणतो, "उत्तर ने काय दिलं या प्रश्नाचं उत्तर हा video आहे. आज कोल्हापुरातून आकाश ने पाठवलंय. मी नतमस्तक आहे".
उत्तर सिनेमात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, हृता दुर्गुळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर निर्मिती सावंत पाहुणे कलाकार म्हणून दिसतात. क्षितीज पटवर्धनने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. उत्तर सिनेमातून क्षितीजने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून याचे शोज हाऊसफूल होत आहेत.