आदेश बांदेकरांनी सांगितलं कशी हवी सूनबाई; सोहमशी लग्न करण्यापूर्वी पास करावी लागेल 'ही' परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:34 IST2023-11-29T15:32:27+5:302023-11-29T15:34:55+5:30
Aadesh bandekar: अलिकडेच सोहमने त्याला कशी बायको हवी हे सांगितलं होतं. त्याच्यावर आता आदेश बांदेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदेश बांदेकरांनी सांगितलं कशी हवी सूनबाई; सोहमशी लग्न करण्यापूर्वी पास करावी लागेल 'ही' परीक्षा
सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत अमृता-प्रसाद जवादे यांच्यासह अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर, मुग्धा वंशपायन-प्रथमेश लघाटे, पूजा सावंत यांसारखे कलाकार लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच महाराष्ट्राचे लाडके भावजी अर्थात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी त्यांना कशी सून हवी आहे हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांचा लेक अभिनेता सोहम बांदेकर (Soham Bandekar) याने त्याला कशी बायको हवी हे सांगितलं होतं.
सोहमने मध्यंतरी इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत त्याने त्याला कशी बायको हवी हे सांगितलं होतं. त्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर आदेश बांदेकरांनी एबीपी माझासोबत बोलताना सूनबाई कशी हवी हे सांगितलं.
'कलाकाराचा मुलगा म्हणून शिडी मिळाली नाही, आजही मी...'; आदेश बांदेकरांचा लेक करतोय स्ट्रगल
"सोहम हा मम्माज बॉय आहे. श्यामच्या आईप्रमाणेच सोहमची आई आहे. तर, आदेश बांदेकर हा त्याचा जवळचा मित्र असं तो म्हणतो. तुझ्या आयुष्यात काही घडतंय का असं मी काही दिवसांपूर्वीच त्याला विचारलं. त्यावर गोड हसला, म्हणाला, बाबा ज्याक्षणी काही वाटेल तेव्हा तुला पहिले सांगणार. आणि, आईला आवडेल त्या मुलीसोबत लग्न करायचं हे त्याने ठरवलं आहे. त्यामुळे जर त्या दोघांना कोणी आवडली तर मी त्याला तथास्तु म्हणणार. आता लग्नाचा विचार त्याने करायला हवा. जर त्याने शेवटी मला शोधायला सांगितलं तर मग मी महाराष्ट्राला सांगणार दार उघड वहिनी दार उघड", असं आदेश बांदेकर म्हणाले.
लग्नाविषयी काय म्हणाला होता सोहम?
'आस्क मी एनिथिंग' या सेशनमध्ये तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी? असा प्रश्न सोहमला विचारण्यात आला होता. त्यावर कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस.. असं उत्तर सोहमने दिलं होतं. दरम्यान, नवे लक्ष्य मालिकेतून सोहमने कलाविश्वात पदार्पण केलं. सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे. अलिकडेच तो बाईपण भारी देवा या सिनेमातही दिसला होता.