"माझे पप्पा, ९३ व्या वर्षात पदार्पण" आदेश बांदेकरांनी शेअर केला वडिलांचा भावुक व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:37 IST2025-02-21T10:34:17+5:302025-02-21T10:37:41+5:30
हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झालेत.

"माझे पप्पा, ९३ व्या वर्षात पदार्पण" आदेश बांदेकरांनी शेअर केला वडिलांचा भावुक व्हिडीओ!
Aadesh Bandekar: महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं नाव कमावलं. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स ते देत असतात. अशातचं आदेश बांदेकर यांच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे.
काल आदेश यांच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यांच्या वडिलांनी ९३ व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. वडिलांच्या वाढदिवशी आदेश यांनी एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये आदेश आणि त्यांच्या वडिलांचे काही खास फोटो दिसून येत आहेत. त्यांनी या व्हिडीओला "लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं" हे गाणं देखील जोडलं आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झालेत.
आदेश यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "चंद्रकांत यशवंत बांदेकर.. माझे पप्पा…२० फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस ९३ व्या वर्षात पदार्पण … आध्यात्मिक संस्कारात वाढलेले…खडतर आयुष्य साकारात्मक दृष्टिकोनातून आनंदमय कसं करायचं हे शिकवणारं आमच्या कुटुंबाच गुरुकुल …वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सुदृढ दिर्घायुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना", या शब्दात त्यांनी आपल्या वडिलांना प्रेमळ शुभेच्छा दिल्यात. या व्हिडीओवर लाखो चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय.