"स्त्रीने डोक्यावर पदर घेतला तरच ती संस्कारी असं वाटतं पण...", रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:08 IST2025-10-08T16:07:33+5:302025-10-08T16:08:29+5:30
Renuka Shahane : मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडदा गाजवणाऱ्या रेणुका शहाणे, केवळ त्यांच्या कामासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक मतांसाठीही ओळखल्या जातात.

"स्त्रीने डोक्यावर पदर घेतला तरच ती संस्कारी असं वाटतं पण...", रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचे नाव आघाडीवर आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि मनमोहक हास्याने त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडदा गाजवणाऱ्या रेणुका, केवळ त्यांच्या कामासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक मतांसाठीही ओळखल्या जातात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत स्त्रियांनी पदर घेतला तरच त्या संस्कारी असतात, यावर आपलं मत व्यक्त केले.
रेणुका शहाणे यांनी अमुक तमुक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या म्हणाल्या की, ''मला ते डोक्यावर पदर घेणं वगैरे हा प्रकार खरंच अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की ती इतकं असं रिग्रेसिव्ह आहे ना कारण त्याच्या मुळात असं नाहीये की ते चांगलं दिसत नाही. ते दिसतं खूप छान पण ते जे काही पेलवण्याचं जे काही प्रेशर आहे ते फक्त बायकांवर असतं एक तर मला ते खूप ऑफेन्सिव्ह वाटतं. पण मला असंही वाटतं की त्याच्यावरुन संस्कार कोणाचे दिसत नाहीत. मी अनेक पदर घेतलेल्या अत्यंत वाईट बायका पाहिलेल्या आहेत. पदर घेतात. सगळं करतात. म्हणजे देवघर स्वच्छ ठेवतात. देवाची पूजा करतील. पण इतक्या घाणेरड्या स्वभावाच्या असतात त्या की त्याच्यामुळे काही दिसत नाही आणि अत्यंत हॉट पॅण्ट घातलेल्या मुली ज्या आपल्या सासू सासऱ्यांसाठी खूप करतात अशा पण मी पाहिलेल्या आहेत. म्हणजे मुळात तुमचं आचरण काय आहे ते महत्त्वाचं आहे. का तुमचा वेष महत्त्वाचा आहे? त्यामुळे मी त्याच्या विरोधात आहे.''
''यावरुन नाही दिसत संस्कार...''
त्या पुढे म्हणाल्या की, ''पण ह्याच्याबद्दल मला नेहमी वाटतं की माझा नवरा मला म्हणतो की नाही नाही तू केलं पाहिजेस हे सगळं वगैरे आणि मी मानते त्यांचं. हे मी अगदी स्पष्टपणे सांगते. शेअर करते आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की काही वेडेपणा आहे. तू अशी नाहीयेस. तर मी म्हटलं की नाही म्हणजे हा भाग सुद्धा आहे माझ्यात नाही असं नाहीये. मला आवडतं म्हणजे माझ्या कुटुंबांना माझ्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे हे मला वाटतं कुठेतरी. छान वाटतं. तर तुम्हाला ठरवायचं आहे की ही लढाई लढायची की स्वीकारायची. पण विचार प्रक्रिया म्हणून मला असं वाटतं की हे म्हणणं की एका स्त्रीने डोक्यावर पदर घेतला तरच ती संस्कारी आहे तर तसं नाहीये. संस्कार फक्त म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ड्रेस करताय ह्याच्यावरुन नाही दिसत संस्कार.''