'स्वप्नांच्या जवळ टाकलेलं छोटेसं पाऊल', अदिती द्रविडची ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:01 IST2022-12-02T18:00:30+5:302022-12-02T18:01:10+5:30
Aditi Dravid :अदिती द्रविडने गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यामुळे ती या चित्रपटाच्याबाबतीत खूप उत्सुक आहे.

'स्वप्नांच्या जवळ टाकलेलं छोटेसं पाऊल', अदिती द्रविडची ती पोस्ट चर्चेत
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' (Gosht Eka Paithanichi) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही गोष्ट आहे एका अशा गृहिणीची, जिचे पैठणी घेण्याचे स्वप्न आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक प्रवास आहे. नुकताच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) हिने इंस्टाग्राम स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
अदिती द्रविडने गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यामुळे ती या चित्रपटाच्याबाबतीत खूप उत्सुक आहे. नुकतेच तिने या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यानचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, प्रिय ए! काल तू तुझे पहिले छोटेसे पाऊल तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेतले! तुम्ही ७० मिमीच्या स्क्रीनवर पोहोचलीस, तू ते केले! आणि मला तुझा खूप अभिमान आहे! आज खूप काही सांगायचे आहे, परंतु मी तुम्हाला क्षणात राहू देईन! तुम्ही ते मिळवले आहे! स्वप्नांचा जयजयकार आणि त्यांना सत्यात उतरवतो. प्रेम, ए! अदिती द्रविडच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर तिचा रसिकांसुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत पाहायला मिळाली होती. आता ती गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करते आहे.