"एका १४ एप्रिल तारखेने.."; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:23 IST2024-04-14T13:23:03+5:302024-04-14T13:23:35+5:30

सिद्धार्थ जाधवने आंबेडकर जयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (siddharth jadhav, babasaheb ambedkar)

A few but important post by Siddharth jadhav on the occasion of Ambedkar Jayanti | "एका १४ एप्रिल तारखेने.."; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट

"एका १४ एप्रिल तारखेने.."; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट

भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज जगभरातील बांधव बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत आहेत. "उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्यामुळे" अशा भावना व्यक्त करत अनेक लोकं बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन करत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने आंबेडकर जयंतीनिमित्त मोजकीच पण महत्वाची पोस्ट लिहिली आहे.

सिद्धार्थ जाधवने बाबासाहेबांचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की,  "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर.. एका १४ एप्रिल तारखेने कित्येकांना समृद्धीची वाट गवसली.. महामानवास कोटी कोटी प्रणाम." सिद्धार्थने ही पोस्ट लिहून बाबासाहेबांचे विचार मांडणारा एक खास फोटोही पोस्ट केलाय. सिद्धार्थच्या या पोस्टखाली अनेकांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

सिद्धार्थ जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. तो आपल्याला शेवटी 'सर्कस' या हिंदी सिनेमात तर 'बालभारती' या मराठी सिनेमात दिसला. याशिवाय सिद्धार्थ 'आता होऊ दे धिंगाणा'च्या दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करत होता. सिद्धार्थने त्याच्या खुमासदार सुत्रसंचालननाने हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय केला. सिद्धार्थच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title: A few but important post by Siddharth jadhav on the occasion of Ambedkar Jayanti