८५ कोटींची ‘सैराट’मय कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:44 IST2016-06-01T11:14:49+5:302016-06-01T16:44:49+5:30
मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा सर्वात मोठा ब्लॉक ब्लस्टर चित्रपट ठरला आहे. मराठी चित्रपट रसिकांच्या नजरा आता १०० कोटी ...
.jpg)
८५ कोटींची ‘सैराट’मय कमाई
म ाठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा सर्वात मोठा ब्लॉक ब्लस्टर चित्रपट ठरला आहे. मराठी चित्रपट रसिकांच्या नजरा आता १०० कोटी क्लबकडे आहेत. कारण सैराट आता ५ व्या आठवड्यात पोहचला असून सोमवारपर्यंत सैराटची कमाई ८५.६६ कोटी इतकी झाली आहे.
सैराट आजही गर्दी खेचत असून ५०० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये दाखविला जात आहे. साहजिकच ‘सैराट’ १०० कोटीचा पल्ला गाठेल असा अंदाज ट्रेड एक्सपर्ट व्यक्त करीत आहेत. तरण आदर्शसारख्या नामवंत ट्रेड एक्सपर्टने तसेच बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक प्रीतिश नंदी यांनीही हा अंदाज व्यक्त केला आहे की, सैराट १०० कोटींचा पल्ला गाठेल. सैराटचे सध्या युनायटेड अरब अमिरातीमध्येही स्क्रिनिंग सुरू आहे.
एकूणच ‘सैराट’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये विराजमान व्हावे, अशीच इच्छा चाहत्यांची असणार.