​‘३५% काठावर पासचा ट्रेलर लॉन्च सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 19:09 IST2016-04-28T13:39:05+5:302016-04-28T19:09:05+5:30

अभिनेता प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला ‘३५% काठावर पास’ हा आगामी चित्रपट लवकरच झळकतोय. नुकताच या सिनेमाचा शानदार ट्रेलर ...

'35% edge trailer launch ceremony | ​‘३५% काठावर पासचा ट्रेलर लॉन्च सोहळा

​‘३५% काठावर पासचा ट्रेलर लॉन्च सोहळा

िनेता प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला ‘३५% काठावर पास’ हा आगामी चित्रपट लवकरच झळकतोय. नुकताच या सिनेमाचा शानदार ट्रेलर लॉन्च सोहळा उत्साहात पार पडला. प्रथमेश परब, यशोमन आपटे, भाग्यश्री संकपाळ, संजय नार्वेकर, माधवी जुवेकर, सुशांत शेलार, भारत गणेशपुरे, ऋतुजा नागवेकर, चैतन्य अडकर आणि पंकज पाडघन अशी संपूर्ण टीम यावेळी सोहळ्याला उपस्थितीत होती. 

या चित्रपटात प्रथमेश एका नव्या धाटणीची भूमिका साकारताना दिसेल. सेजल शिंदे फिल्म्स, ५२ फ्रायडे आणि ड्रिमसेलर एन्टरटेन्मेन्ट सिनेमाज हे सादरकर्ते असलेल्या ह्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सतीश मोतलिंग यांचे आहे. प्रथमेश या चित्रपटात पुन्हा नव्याने विनोदांची जोरदार फटकेबाजी करण्यास सज्ज असल्याने ही ३५% टक्कयांची ही गोष्ट बॉक्स आॅफिसवर नक्कीच १००% यशस्वी होणार की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरेल.

Web Title: '35% edge trailer launch ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.