प्रशांत दामलेंना नाट्यसृष्टीत ३३ वर्ष पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 12:08 IST2016-06-08T06:38:50+5:302016-06-08T12:08:50+5:30
मराठी नाट्यसृष्टीतील एव्हरग्रीन सुपरस्टार प्रशांत दामले आज यांना नाट्यसृष्टीत ३३ वर्ष पूर्ण झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व रसिक प्रेक्षकांनी प्रशांत ...

प्रशांत दामलेंना नाट्यसृष्टीत ३३ वर्ष पूर्ण
प्रशांत दामले यांच्या करिअरची सुरुवात १९८३ साली ‘टूर टूर’ या नाटकापासून झाली. त्यांनी चित्रपटदेखील केले. मराठी नाटक क्षेत्रातील सुपरस्टार म्हणून प्रशांत दामलेंना संबोधले जाते. त्यांनी रंगमचावर जवळ-जवळ ११ हजार प्रयोग केले. ही त्यांची नाटक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची कामगिरी आहे.
'एका लग्नाची गोष्ट', 'लग्नाची बेडी', 'ब्रम्हचारी', 'गेला माधव कुणीकडे', 'सुंदर मी होणार' आणि हल्लीचं 'बहुरुपी', 'कार्टी काळजात घुसली' आणि 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकांतून प्रशांत दामलेंनी प्रेक्षकांना त्यांच्या अप्रतिम अभिनयाने मंत्रमुग्ध केलं आणि पुढेही नक्कीच करतील.
प्रशांत सरांना रंगमंचावर प्रेक्षकांकडून नेहमी ‘वन्स मोअर’ मिळाला आहे. गेल्या ३३ वर्षाप्रमाने पुढेही प्रशांत दामलेंनी आम्हां रसिकांचे निखळ मनोरंजन करत राहावे. प्रेक्षकांकडून प्रशांत सरांना ‘वन्स मोअर’ तर कायम मिळत राहणार याची खात्री आहे.