मराठीतील हा हॅण्डसम हंक अभिनेता करतोय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:17 IST2019-11-27T13:10:30+5:302019-11-27T13:17:14+5:30
आपल्या पिळदार शरीरयष्टीने सर्वांना त्याने भुरळ पाडली आहे.

मराठीतील हा हॅण्डसम हंक अभिनेता करतोय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीत मिळालेल्या यशानंतर भूषण प्रधान आता बॉलिवूडकडे वळला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भुषण प्रधान म्हणाला की, 2020 हे वर्ष माझ्यासाठी खूप बिझी असणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत रायमा सेन दिसणार आहे. भुषण प्रधान पहिल्यांदाच रायमा सेनसोबत या चित्रपटाच्या निमित्ताने काम करतो आहे.
या सिनेमाची कथा मानवी तस्करीवर आधारीत असून यात सामाजिक संदेशदेखील देण्यात येणार आहे. या चित्रपटात भूषण व रायमा यांच्याव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब व तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
भूषण प्रधान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमाचे फोटो, फिटनेसचे व्हिडिओ, हॉलिडेचे फोटो भूषण फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे त्याला त्याचे फॅन्सदेखील मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.