2016 मराठी चित्रपट क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:15 IST2016-02-10T03:45:03+5:302016-02-10T09:15:03+5:30

दुनियादारी चित्रपटातून शिरीनच्या भूमिकेतून तरूणांना वेड लावणारी सई ताम्हणकार यंदा २०१६ या वर्षाची मराठी चित्रपट क्वीन बनणार आहे? विचारात ...

2016 Marathi Movie Queen | 2016 मराठी चित्रपट क्वीन

2016 मराठी चित्रपट क्वीन

नियादारी चित्रपटातून शिरीनच्या भूमिकेतून तरूणांना वेड लावणारी सई ताम्हणकार यंदा २०१६ या वर्षाची मराठी चित्रपट क्वीन बनणार आहे? विचारात पडला असेल ना हे काय आता, हो खरं आहे. कारण सई या वर्षी एक, दोन किवा तीन चित्रपटातून नाही तर तब्बल पाच चित्रपटातून झळकणार आहे. सईच्या फॅन्ससाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. यापूर्वी तिने मराठी चित्रपटसृष्टीला तू ही रे, पोरबाजार, दुनियादारी, क्लासमेट असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. तसेच तिने आपला मराठी बाणा बॉलिवुडलादेखील हंटर या  चित्रपटाच्या माध्यमातून दाखविला आहे. आता, तर २०१६ या वर्षी सई राक्षस, फॅमिली कट्टा, वायझेड, जाऊ दया ना बाळासाहेब, वजनदार या पाच चित्रपटांची मेजवानी देणार आहे. ही मेजवानी नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असे गृहीत धरून, २०१६ ची मराठी चित्रपटाची क्वीन बनण्यास सई ताम्हणकरला शुभेच्छा देउयात.

Web Title: 2016 Marathi Movie Queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.