१५ ऑगस्टला 'आत्महत्या न करण्याची शपथ'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:00 IST2016-07-15T08:30:19+5:302016-07-15T14:00:19+5:30
‘ईद का चाँद देखा, होली के रंग देखे, राजाओं का घराना देखा, सुलतांनो का लाईफ देखा, अब थोडा गरीबोओं ...
.jpg)
१५ ऑगस्टला 'आत्महत्या न करण्याची शपथ'!
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">‘ईद का चाँद देखा, होली के रंग देखे, राजाओं का घराना देखा, सुलतांनो का लाईफ देखा, अब थोडा गरीबोओं के लिए स्वातंत्र्य दिन देखो’ अशी साद देत आजच्या ग्रामीण जीवनशैलीचे यथार्थ दर्शन घडविणारा 'गणवेश' चित्रपट आजची भारतातील खेड्यापाड्यातली परिस्थिती नेमकी कशी आहे ती चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतो. 'गणवेश'च्या निमित्तानं एक विशेष पाऊल उचलून येत्या १५ ऑगस्टनंतर समाजातल्या कोणत्याही घटकाने आत्महत्या करू नये म्हणून एक चळवळरुपी मोहीम आखून १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्यदिनाला खऱ्या अर्थानं मानवंदना दिली जाणार आहे. हा संपूर्ण महिना राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन 'गणवेश' चित्रपट पाहून प्रभावित झालेले डीआयजी डी. बी. कासार यांनी केले आहे.