प्रियाकांच्या 'व्हेटीलेटर' मध्ये ११६ कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 15:51 IST2016-04-22T10:21:47+5:302016-04-22T15:51:47+5:30
बॉलीवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रडा हिच्या मराठीच्या पदार्पणाने बरीच चर्चा रंगली होती. तसेच हळूहळू तिच्या या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्ट ...
.jpg)
प्रियाकांच्या 'व्हेटीलेटर' मध्ये ११६ कलाकार
ब लीवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रडा हिच्या मराठीच्या पदार्पणाने बरीच चर्चा रंगली होती. तसेच हळूहळू तिच्या या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्ट उलगडत जाताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने चित्रपटाचे नाव व्हेटीलेटर असे घोषित केले. पण प्रियाकांचा हा चित्रपट म्हटल्यावर त्यामध्ये कोण कलाकार असणार या विचारात मात्र सगळेच पडलेच होते. पण आता या गोष्टीचा उलगडा झाला आहे. या चित्रपटात एक, दोन नव्हे तर तब्बल ११६ कलाकारांचा समावेश आहे. पण या शंभरीमध्ये शशांक शेंडे, सुकन्या कुलकर्णी, उषा नाडकर्णी, राहुल सोलापूरकर यांचा समावेश असल्याचे कळते. एवढया मोठया संख्येने मराठी कलाकार एकत्रित व एकाच चित्रपटात समावेश असण्याचा हा मराठी इंडस्ट्रीत पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियंका जरी हॉलीवुड प्रोजेक्टमध्ये बिझी असली तरी सर्व चित्रपटाचे कार्य तिची आई मधु चोप्रा सांभाळत आहे.राजेश मापुसकर हे व्हेटिंलेटर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी फरारी की सवारी हा चित्रपट केला होता. हा चित्रपट गणपती उत्साहात प्रदर्शित होणार आहे. असो, पण प्रियकांच्या या चित्रपटातील कलाकारांचा हा आकडा पाहता सर्वाना धक्का बसला असणार!