कोडमंत्र या नाटकासाठी ठरला शंभरावा प्रयोग अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 15:08 IST2016-12-28T15:08:30+5:302016-12-28T15:08:30+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाटकाची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एक से एक नवीन नाटक येऊ घालत आहे. त्याचप्रमाणे ...

100th anniversary of the CodeMantra play was unforgettable | कोडमंत्र या नाटकासाठी ठरला शंभरावा प्रयोग अविस्मरणीय

कोडमंत्र या नाटकासाठी ठरला शंभरावा प्रयोग अविस्मरणीय

्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाटकाची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एक से एक नवीन नाटक येऊ घालत आहे. त्याचप्रमाणे रंगभूमीवर सादर होणारे नाटक ही पन्नास, शंभर, सहाशेचा आकडा पार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, कोडमंत्र या नाटकाने नुकतेच शंभर प्रयोग पूर्ण केले आहे. या नाटकामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना दिसत आहे. या नाटकाच्या यशाबाबत मुक्ताने नुकतेच सोशलमीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगते,  कोडमंत्र नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्तानं आम्ही एक छोटासा सोहळा आयोजित केला होता. संपूर्ण टीमच यावेळी कौतुक करण्यात आले. तसेच आणखी एक खूप छान गोष्ट म्हणजे त्या दिवशी एका खास पुस्तकाचं प्रकाशन ही करण्यात आले आहे. आमचे लाडके दिनू काका म्हणजेच दिनेश पेडणेकर) यांनी नाटकाच्या सगळ्या टीमची ओळख करून देणारी छोटी छोटी आर्टिकल्स नाटकाच्या फेसबूक पेजवर क्रमश: पोस्ट केली होती. त्यांच संकलन आणि त्या निमित्तानं कोडमंत्र नाटक कसं उभं राहिलं याची माहिती या पुस्तकात आहे. पुस्तक काढायची आयडिया तर डोक्यात आली पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी? हा प्रश्न उपस्थित राहिला होता. मात्र या पुस्तकाची आयडिया माझाच नाटकातील सहकलाकार कौस्तुभ दिवाणच्या डोक्यात आली म्हणून त्याचे ही विशेष कौतुक करावेसे वाटते. त्यामुळे आमच्या सर्वासाठी १०० वा प्रयोग हा खºया अर्थाने अविस्मरणीय ठरला आहे. तसेच या नाटकामध्ये तिच्यासोबत उमेश जगताप,विक्रम गायकवाड, कौस्तुभ दिवाण, अमित जांभेकर,अजय कासुर्डे, फैज खान, संजय महाडिक आणि संजय खापरे यां कलाकारांचा समावेश आहे. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतराताना दिसत आहे. 



Web Title: 100th anniversary of the CodeMantra play was unforgettable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.