"६३ वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण...", सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:21 IST2026-02-07T14:15:16+5:302026-02-07T14:21:56+5:30

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले, शाहरुखचं उदाहरण देत म्हणाले…

marathi cinema legendary actor sachin pilgaonkar talk about social media trolling  | "६३ वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण...", सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले

"६३ वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण...", सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले

sachin Pilgaonkar : हल्लीच्या काळात सोशल मीडियाचा वापर  वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.सोशल मीडिया जितकं एखाद्याचं कौतुक केलं जातं तितकंच त्याला ट्रोल देखील केलं जातं. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळींनाही याचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही कलाकार ट्रोलिंगवर वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना आता एका मुलाखतीत कलाकारांच्या सोशल मीडियावर होणार्‍या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

सचिन पिळगांवकर हे मराठीतील दिग्गज अभिनेते आहेत.अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी सिनेसृष्टीवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके आपल्या रसिकजणांचे ते विविध माध्यमातून मनोरंजन करत आहेत. अलिकडेच रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावंकर म्हणाले,"आताच काळ असा आहे की तुम्हाला विचारपूर्वक व्यक्त व्हावं लागतं. पण, याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांच्या सांगण्यांनुसार जगावं असा होतं नाही. एखादा सिनेमा बघून जर त्यातील काम तुम्हाला आवडलं नाहीतर त्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांना जर समजावायला गेलो तर आपलाच वेळ वाया जाईल."

पुढे ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकर म्हणाले,"ट्रोलिंग झालं तरीसुद्धा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. काळजी करण्याचं काम कधी होईल, जेव्हा ती संख्या कमी होईल.मग ते शाहरुखचं उदाहरण देत म्हणाले," शाहरुखला कोणीतरी विचारलेलं, ट्रोलिंगमुळे तुला त्रास नाही होत? त्यावर तो म्हणालेला, 'एक माणूस ज्याने आयुष्यात कधीच काहीच नाही केलं, तो माणूस जर असं ट्रोल करून रात्री शांत झोपत असेल. तर त्याच्या झोपेचं कारण मी आहे. त्यामुळे मी आनंदी आहे."

सोशल मीडियावर आता मी इतका प्रसिद्ध आहे की...

"माझ्यासारख्या माणसाला ज्याची ३१ डिसेंबरला करिअरची ६२ वर्ष पूर्ण होणार आहेत आणि ६३ वर्ष जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर करिअरच्या ६३व्या वर्षी ह्या लोकांना मी इतका महत्वाचा वाटत असेल, तर ह्याच्याहून जास्त मला काय पाहिजे. सोशल मीडियावर आता मी इतका प्रसिद्ध आहे की, त्यामुळे मला आता खूप जाहिराती मिळतायत. तर ठीके ना! हा पण बदल आहे. हे काम करणारी मुलं आहेत. ती मुलं असल्यामुळे त्यांना मी भरभरून आशीर्वाद देतो. त्यांचं नाव व्हावं, असा माझा त्यांना आशीर्वाद आहे." अशी प्रतिक्रिया सचिन यांनी मुलाखतीत दिली. 

Web Title : 63 साल बाद सचिन पिळगांवकर ने सोशल मीडिया ट्रोलिंग पर बात की।

Web Summary : दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर ने सोशल मीडिया ट्रोलिंग पर बात की, विचारपूर्वक अभिव्यक्ति के महत्व पर जोर दिया। वह वास्तविक प्रतिक्रिया को महत्व देते हैं लेकिन व्यक्तिगत हमलों को खारिज करते हैं। वह अपनी ऑनलाइन लोकप्रियता में मनोरंजन पाते हैं और ट्रोलर्स को आशीर्वाद देते हैं।

Web Title : Sachin Pilgaonkar speaks on social media trolling after 63 years.

Web Summary : Veteran actor Sachin Pilgaonkar addresses social media trolling, emphasizing the importance of thoughtful expression. He values genuine feedback but dismisses personal attacks. He finds amusement in his online popularity and blesses the trolls.