पाय थरथरत होते, गुडघा साथ देईना, तरीही ५००० पायऱ्या...; विशाखा सुभेदार यांनी सांगितला गिरनार पर्वताचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:16 IST2025-12-03T17:15:29+5:302025-12-03T17:16:07+5:30

विशाखा सुभेदार कामातून वेळ काढून गुजरातला फिरण्यासाठी गेल्या होत्या. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

marathi actress vishakha subhedar shared girnar climed experinced | पाय थरथरत होते, गुडघा साथ देईना, तरीही ५००० पायऱ्या...; विशाखा सुभेदार यांनी सांगितला गिरनार पर्वताचा अनुभव

पाय थरथरत होते, गुडघा साथ देईना, तरीही ५००० पायऱ्या...; विशाखा सुभेदार यांनी सांगितला गिरनार पर्वताचा अनुभव

अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. विशाखा सुभेदार कामातून वेळ काढून गुजरातला फिरण्यासाठी गेल्या होत्या. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 

द्वारका, सोमनाथ, गोरक्षनाथ आणि गिरनार अशी यात्रा त्यांनी केली. गिरनार पर्वतही अर्धा सर केला. याचा अनुभव अभिनेत्रीने सांगितला आहे. विशाखा सुभेदार पोस्टमध्ये म्हणतात, "गिरनार यात्रा... बाबा गिरनारी दर्शन झाले ते भरत बलवल्ली ह्या माझ्या बंधूमुळे... हे सगळं शक्य झालं आमच्या देवमाणसामुळे... तो म्हणाला की मी आहे चल आणि त्यांना आहे की काळजी. आधी द्वाराका जाऊ मग सोमनाथ आणि मग गोरक्षनाथ आणि गिरनार. द्वारकेला ध्वजारोहण सोहळा झाला, त्याचा नावाचा ध्वज फडकतो दरवर्षी द्वारकाधीश मंदिरावर..! मग रुख्मिणी दर्शन,  द्वाराका सुदामा कृष्ण भेट स्थळ, नागेश्वरमंदिर हे सुद्धा केवळ त्याच्यामुळेच झालं. आणि मग आम्ही निघालो गिरनार". 

"आयुष्यात मला कधीच वाटलं नव्हतं मी ह्या इतक्या पायऱ्या चढेन. जेमतेम १०-१५ पायऱ्या चढणारी मी ५००० पायऱ्या चढले. पाय थरथरत होते, गुढघे बोलत होते. पण नाम काळजात मुखात सुरुच होतं. महाराजांनी करवून घेतले! अवघड वाट सोपी केली. ५००० पायऱ्या रोपवे, आधीच त्यांनी सोय केली होतीच....अर्धा गड ते स्वतः आलेच की आपल्याला घेऊन जायला, आता राहिला अर्धा... करू कीं पार..! डोली केली होती, समजा नाहीच झेपलं तर म्हणून...पण देवाच्या कृपेने गरज नाही लागली. तोही बिचारा डोलीवाला मला सांगत होता "थोडा ही रेहे गया" मला सोबत आणि प्रोत्साहन देत होता.. आधी म्हणत होता, डोली चढो पण माझी इच्छा बघून शेवटी त्यानीही मनाची शक्ती वापरायला मदतच केली. दर्शन झाल्यावर गड उतरताना मात्र एका टप्प्यात वापरावी लागली कारण गुडघा साथ देईना झाला. त्या गुडघ्याला बिच्याऱ्याला सॉरी आणि इथवर साथ दिली म्हणून thank u म्हटले आणि डोली घेतली.. त्या माणसांचीदेखील कमाल आहे बाई... हे एवढं ओझं घेऊन चढा उतरायचंय सोपं नव्हेच", असं म्हणत त्यांनी अनुभव सांगितला.


पुढे विशाखा सुभेदार म्हणाल्या, "दर्शन...खरंच ती दोन मिनिट दर्शनाची...डोळे भरले, मन तृप्त झालं, काळजात देव भरला.. डोळ्यात भाव भरला, मनात प्रेम भरलं, आणि देव मायेची शिदोरी भरून घेतली. अन्नछत्रमधला प्रसाद तिथलं पाणी आणि शिस्त सगळंच भारावून टाकणारं. पेटती धुनी...अंबाजी... सगळी दर्शनं मनोभावे केली आणि तिथून निघताना खरंच पाऊल नव्हतं पडत. हट्टाने,आज राहते की गडावर असंच वाटत होते..! बाबा गिरनारी भेटला..🙏हे सहा दिवस.. मंत्र श्लोक जप ध्यान करीत करीत फक्त तुझ्यातच, माझ्यामाझ्यातच होते मी... आणि एक मज्जा म्हणजे, हा प्रवास आम्ही माझ्या गाडीने केला.. ते सुद्धा एक वेगळं थ्रील असतं.. माझा नवरा महेश,मी आणि पॅडी सगळेच ड्राइव्ह करणारे, मज्जेत झाला प्रवास..!".

Web Title : विशाखा सुभेदार की गिरनार चढ़ाई: बाधाओं को पार, आध्यात्मिक यात्रा

Web Summary : अभिनेत्री विशाखा सुभेदार ने अपनी चुनौतीपूर्ण लेकिन संतोषजनक गिरनार तीर्थयात्रा का वर्णन किया। कांपते पैरों और दर्द करते घुटनों के बावजूद, उन्होंने 5000 सीढ़ियाँ चढ़ीं। आस्था और समर्थन के साथ, वह शिखर पर पहुँची, अपनी गुजरात यात्रा के दौरान एक गहरे आध्यात्मिक और परिवर्तनकारी अनुभव का वर्णन किया।

Web Title : Vishakha Subhedar's Girnar Climb: Overcoming Odds, Spiritual Journey Ascends

Web Summary : Actress Vishakha Subhedar recounts her challenging yet fulfilling Girnar pilgrimage. Despite trembling legs and aching knees, she climbed 5000 steps. With faith and support, she reached the summit, describing a deeply spiritual and transformative experience during her Gujarat trip.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.