व्वा रे पठ्ठ्या! MPSCमध्ये महाराष्ट्रातून ४२वा आला मराठी अभिनेत्रीचा भाऊ; आनंद गगनात मावेना
By कोमल खांबे | Updated: October 31, 2025 12:08 IST2025-10-31T12:07:38+5:302025-10-31T12:08:48+5:30
नुकताच MPSC परिक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत अभिनेत्रीचा भाऊ महाराष्ट्रात ४२वा आला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

व्वा रे पठ्ठ्या! MPSCमध्ये महाराष्ट्रातून ४२वा आला मराठी अभिनेत्रीचा भाऊ; आनंद गगनात मावेना
दरवर्षी लाखो विद्यार्थी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्पर्धा परिक्षांची तयारी करत असतात. पण, त्यातील फार कमी जणांना या परिक्षेत उत्तीर्ण होत सेवेत रुजू होण्याची संधी मिळते. मराठी अभिनेत्रीच्या भावानेही या MPSC परिक्षेत यश मिळवलं आहे. नुकताच MPSC परिक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत अभिनेत्रीचा भाऊ महाराष्ट्रात ४२वा आला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या लहान भावाने यशाला गवसणी घातली आहे. MPSC परिक्षेत भावाने मिळवलेलं यश पाहून संस्कृती भारावून गेली आहे. तिने खास पोस्ट शेअर करत भावाचं कौतुक करत स्वत:चा आनंद व्यक्त केला आहे. "हा माझा लहान भाऊ! MPSCच्या परीक्षेत, महाराष्ट्रात ४२व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला !! तुला कल्पना नसेल इतका मला तुझा गर्व वाटत आहे", असं संस्कृतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी संस्कृतीच्या भावाचं अभिनंदन केलं आहे.
संस्कृतीच्या भावाचं नाव समर्थ बालगुडे असं आहे. समर्थ हा पेशाने वकील असून त्याने सायबर लॉचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहान भावाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत यश मिळवल्याने संस्कृतीची मान अभिमानाने आणि गर्वाने उंचावली आहे. बहीण अभिनेत्री तर आता भाऊ राज्याच्या सेवेत रुजू होणार आहे.