'घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा...', पूजा नायकला कशी मिळाली 'बेस्ट फ्रेंड्स'ची साथ; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:34 AM2024-04-17T10:34:39+5:302024-04-17T10:36:26+5:30

पूजा अशा प्रकारे व्यक्त झाल्यानंतर सुलेखा तळवलकर म्हणाल्या...

marathi actress Pooja Nayak speaks on her divorce for first time on Lokmat Filmy joined by Sulekha Talwalkar and Amruta Sant | 'घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा...', पूजा नायकला कशी मिळाली 'बेस्ट फ्रेंड्स'ची साथ; म्हणाली...

'घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा...', पूजा नायकला कशी मिळाली 'बेस्ट फ्रेंड्स'ची साथ; म्हणाली...

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री आहे. पूजा नायक (Pooja Nayak), सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) आणि अमृता संत (Amruta Sant) या अभिनेत्री 20 वर्षांपासून  मैत्रिणी आहेत. एकमेकींच्या सुखदु:खात तिघींनी साथ दिली आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यात ओळख झाली आणि बघता बघता तिघी घट्ट मैत्रिणी झाल्या. या तिघी मैत्रिणींनी नुकतंच 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत अनेक किस्से सांगितले.  

मराठी अभिनेत्री पूजा नायक गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. मालिका, सिनेमांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. मात्र वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर ती पहिल्यांदाच व्यक्त झाली. 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' शोमध्ये पूजा नायक म्हणाली, "माझ्या काही वैयक्तिक अडचणी होत्या. मी घटस्फोट घेणार होते. तेव्हा मी या दोघींना फोन केला. मला भेटायचं आहे बोलायचं आहे असं सांगितलं. आम्ही भेटलो तेव्हा मी एकच वाक्य बोलले की मी आता नाही राहू शकते त्यामुळे मी घटस्फोटाचा निर्णय घेत आहे. यावर दोघी फक्त बरं एवढंच म्हणाल्या. यानंतर मला वाटलं या दोघी विचारतील काय झालं, कसं झालं मग काहीतरी सांगतील असं करुन बघ वगैरे. माझी थोडी रडारड होईल. मी त्या तयारीनेच गेले होते. कारण आतमध्ये खूप साचलं होतं. पण या दोघींनी तो विषय बाजूला ठेवून बाकीचे विषय काढले आणि इतक्या सुंदर पद्धतीने माझीच उत्तरं मला मिळाली."

त्या पुढे म्हणाल्या, "आपल्या फील्डमध्ये लोकांना खूप चौकशी असतात की काय झालं कसं झालं. पण नशिबाने माझ्या आयुष्यात दोन अशा मैत्रिणी आहेत ज्यांना हे ऐकण्यात रसच नाहीए. त्यांना फक्त एवढंच हवंय की कोणत्या गोष्टीने तू आनंदी होऊ शकतेस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे."

पूजा अशा प्रकारे व्यक्त झाल्यानंतर सुलेखा तळवलकर म्हणाल्या की ही आज पहिल्यांदा कोणत्यातरी प्लॅटफॉर्मवर घटस्फोट या विषयावर बोलली आहे. नाहीतर हा विषय सहसा ती काढत नाही.

अभिनेत्री पूजा नायकने 'अथांग', 'एक हजाराची नोट','अंकुश' सह अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Web Title: marathi actress Pooja Nayak speaks on her divorce for first time on Lokmat Filmy joined by Sulekha Talwalkar and Amruta Sant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.