मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या गाण्यावर पर्ण पेठेने धरला ताल; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:43 IST2022-01-20T14:40:57+5:302022-01-20T14:43:21+5:30
Parna pethe: उत्तम अभिनयशैली आणि निखळ सौंदर्य यांच्या जोरावर पर्ण पेठेने अनेक तरुणांच्या मनावर गारुड घातलं आहे.

मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या गाण्यावर पर्ण पेठेने धरला ताल; पाहा Video
'वायझेड', 'फोटोकॉपी', 'रमामाधव' अशा कितीतरी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे. उत्तम अभिनयशैली आणि निखळ सौंदर्य यांच्या जोरावर पर्ण पेठेने अनेक तरुणांच्या मनावर गारुड घातलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे पर्णदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असते. यात अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिचे हे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात.
सध्या सोशल मीडियावर पर्ण पेठेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या एका गाजलेल्या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे.
पर्णच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती 'जोगवा' या चित्रपटातील 'मन रानात गेलं गं..' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने साधा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. प्लॅनेट मराठीने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला स्वानंदी असं कॅप्शन दिलं आहे.