"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:38 IST2025-08-30T11:37:34+5:302025-08-30T11:38:23+5:30
सुरुवातीच्या काळात मात्र मेघाला मराठी सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला. तिच्यासोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला. तेव्हा नवीन असल्यामुळे मेघाला काय करायचं ते समजलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मेघाने याबद्दल भाष्य केलं आहे.

"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
लावणीसम्राज्ञी आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेघा घाडगे हिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये मेघा दिसली. 'पछाडलेला'मधली तिची लावणी आजही लोकप्रिय आहे. 'माहेरची माया', 'परतु', 'चल धर पकड', 'नवरा माझा भवरा', 'चालू द्या तुमचं', 'पोपट' अशा मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, सुरुवातीच्या काळात मात्र मेघाला मराठी सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला. तिच्यासोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला. तेव्हा नवीन असल्यामुळे मेघाला काय करायचं ते समजलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मेघाने याबद्दल भाष्य केलं आहे.
मेघाने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मराठी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा प्रसंग सांगितला. मेघा म्हणाली, "मराठी चित्रपटात कॉम्प्रोमाइजचे दोन अनुभव आले. म्हटलं हे आपल्याच्याने आता होणार नाही. थोडंसं थांबवा... मला असं वाटतं की मला अनुभव नव्हता या सगळ्या गोष्टींचा... मी नवीन होते. मला त्याच्या बोलण्यावर मात करता आली असती. मी त्यांना दोषी धरतच नाहीये. तुला मोठं काम देतो वगैरे... त्यावेळी कोणी माझा मॅनेजर नाही. कोणी सपोर्ट करणारं नाही. कॉन्ट्रॅक्ट काय असतं ते माहीत नाही. कोणाला जाऊन भेटायचंय. तो माणूस चांगला की वाईट हेही माहीत नाही. ते इंडस्ट्रीमधले पण नव्हते बहुतेक. काय माहिती नाही मला...आजपर्यंत तरी दिसले नाहीत ते मला...मराठी भाषिकच होते ते लोक...".
पुढे मेघा म्हणाली, "तिथे मला बोलता आलं असतं. मी रिअॅक्ट व्हायला हवं होतं. बोलता आलं पाहिजे ना तुम्हाला त्या वेळेला...तुम्हाला कळलं पाहिजे ना स्ट्राँगली... की या माणसाचा उद्देश वेगळा आहे बाई...दोन कानाखाली देता आल्या असत्या तिकडे मला...मी नाही दिल्या. मला भीती वाटली की मी नवीम आहे इंडस्ट्रीत. आणि जर माझी चर्चा दुसरीकडे कुठे अशा पद्धतीने झाली...बदनामी झाली...यातलीच मी होते...मला नाही बोलता आलं तिकडे".