“आता वेळ आलीए पूर्णविराम...; सुव्रत जोशीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, चाहते झाले निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 20:46 IST2022-12-24T20:44:34+5:302022-12-24T20:46:10+5:30

'दिल दोस्ती दुनियादीर' या मालिकेतून प्रसिध्दी झालेला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

marathi actor suvrat joshi quitting marathi play said in latest post | “आता वेळ आलीए पूर्णविराम...; सुव्रत जोशीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, चाहते झाले निराश

“आता वेळ आलीए पूर्णविराम...; सुव्रत जोशीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, चाहते झाले निराश

'दिल दोस्ती दुनियादीर' या मालिकेतून प्रसिध्दी झालेला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत त्याने सुजय साठे ही भूमिका केली. ही भूमिका आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. यानंतर पुढे अभिनय क्षेत्रात त्याने पाठिमागे वळून पाहिले नाही. शिकारी, गोष्ट एका पैठणीची अशा सिनेमात त्याने काम केले. सध्या सुव्रत जोशी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

'शरीर प्रदर्शन ही...', शर्टचं बटण उघडं ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

सुव्रत जोशीने पुढ अनेक मराठी चित्रपटाच काम केले आहे. सुव्रत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या घडामोडी चाहत्यांना देत असतो. सध्या त्याने पोस्ट शेअर करुन 'आता पूर्णविराम देण्याची वेळ झाली' असं लिहिलं आहे. या पोस्टला अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ही पोस्ट एका नाटक 'अमर स्टुडिओ'विषयी आहे. या नाटका संदर्भात त्याने चाहत्यांना महत्वाची अपडेट दिली आहे. 

सुव्रत जोशीची पोस्ट काय आहे?

सुव्रत जोशीने इन्स्ट्रग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.'२०१६ साली नव्या दमाच्या काही कलाकारांसोबत, प्रवासाला सुरुवात केली. अमर फोटो स्टुडिओ हे त्या प्रवासाचं नांव! मोठ मोठ्या कलाकारांच्या जोरात चाललेल्या नाटकांच्या पंगतीत आपल्या ह्या नवीन मेन्यूला कशी दाद मिळेल ह्याची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होती, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'मनस्विनी लता रविंद्र लिखित, निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक १३ ॲागस्ट २०१६ साली रंगमंचावर आलं! अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे ह्या पाच दमदार कलाकारांनी उत्कृष्ट पद्धतीने ते नाटक सादर करून सर्व वयोगटातील नाटक वेड्या प्रेक्षकांची मनं जिकली, आणि महाराष्ट्रासहीत देश-विदेशात अत्यंत यशस्वी प्रयोग केले. सखी आणि सिद्धेश वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने थोडे विसावले, पण पर्ण पेठे आणि साईनाथ गणूवादने नाटकाच्या यशाची घोडदौड चालूच ठेवली.

पण….. आता वेळ आलीए पूर्ण विराम देण्याची, असं पोस्टमध्ये सुव्रत जोशीने म्हटले आहे. 'ज्या प्रेक्षकांनी उदंड प्रेम देऊन आम्हाला आनंद दिला, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी, जानेवारी २०२३ मधे ह्या नाटकाचे मोजके प्रयोग करीत आहोत. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येऊ तेव्हा नक्की भेटू, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title: marathi actor suvrat joshi quitting marathi play said in latest post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.