Girish Oak : एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार..., गिरीश ओक यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 01:31 PM2023-03-30T13:31:57+5:302023-03-30T13:32:48+5:30

माझा प्रतिस्पर्धी मीच..., अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट गिरीश ओक (Girish Oak) यांनी शेअर केली आहे. सध्या या पोस्टचीच चर्चा आहे.

Marathi Actor girish oak wins zee natya gaurav award for his drama | Girish Oak : एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार..., गिरीश ओक यांची पोस्ट चर्चेत

Girish Oak : एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार..., गिरीश ओक यांची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

'अग्गबाई सासुबाई' या मालिकेत गिरीश ओक (Girish Oak) यांच्या शेफ अभिजीत राजेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आहेत. त्यांच्या या भूमिकेला चाहत्यांचंही प्रचंड प्रेम मिळालं. नाटक असो, मालिका किंवा सिनेमा  त्यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते झालेत. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. माझा प्रतिस्पर्धी मीच..., असं लिहित त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टचीच चर्चा आहे.


 
गिरीश ओक यांची पोस्ट...
माझा प्रतिस्पर्धी मीच
असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा झालं.
सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत.
"३८ कृष्ण व्हिला" आणि "काळी राणी"
झी नाट्य गौरवला ह्या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं.
दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एक मेकींसमोर उभ्या ठाकल्या.
आणि काल चक्क दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला.
मला कळंतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते.
आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ?
पण असं नाही नं सांगता येत एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत.
"३८" चे १२५ होत आले आहेत आणि "राणी" चे ५० फक्त...., असं त्यांनी लिहिलं आहे. 

गिरीश ओक यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे माेर्चा वळवला. गिरीश ओक यांनी नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केली. 
 

Web Title: Marathi Actor girish oak wins zee natya gaurav award for his drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.