Manike mage hithe फेम योहानीसोबत जॅकलिन फर्नांडिसचा जबरदस्त डान्स; काही तासांतच तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:27 IST2021-11-05T15:21:06+5:302021-11-05T15:27:11+5:30
Manike mage hithe या गाण्याचे बोल जरी कळत नसले तरी प्रत्येकालाच या गाण्याने चांगलीच भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे.

Manike mage hithe फेम योहानीसोबत जॅकलिन फर्नांडिसचा जबरदस्त डान्स; काही तासांतच तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. याच व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटीझन्स या व्हिडीओवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आहे जॅकलिन फर्नांडिस आणि श्रीलंकन सेन्सेशन योहानीचा. दोघांनी व्हिडीओत मनिके मागे हिते गाण्यावर थिरकताना दिसत आहे. खुद्द जॅकलिननेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच नेटीझन्सच्या नजरा यावर वळल्या आणि वारंवार आता हा व्हिडीओ पाहिला जात आहे. शेअर केल्यापासून या व्हिडीओला काही तासांतच ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
जॅकलीनसुद्धा श्रीलंकेची आहे.त्यामुळे योहानीसह जॅकलिनचे खूप चांगले ट्युनिंग जमल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. सध्या या व्हिडीओवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दोघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.व्हिडिओमध्ये जॅकलिन फर्नांडिसने व्हाइट एथनिक ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. गायिका योहानी देखील काळ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये कमालीची सुदंर दिसत आहे.
योहानीने नुकतीच बिग बॉस शोमध्येसुद्धा हजेरी लावली होती. सलमानसुद्धा गाजलेल्या गाण्याचा मोह आवरु शकला नाही. योहानीसोबत त्यानेसुद्धा हे गाणे गाण्याचा प्रयत्न त्याने केला होता. बिग बॉस शोमधला योहानी आणि सलमानच्या व्हिडीओलाही चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले होेत. मनिके मागे हिते या गाण्याचे बोल जरी कळत नसले तरी प्रत्येकालाच या गाण्याने चांगलीच भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सारेच या गाण्यावर ठेका धरत व्हिडीओ बनवत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर या गाण्याचे वेगवेगळे व्हर्जनसुद्धा चाहते बनवत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरितच गाण्याने सगळ्यांचीच मनं जिंकल्याचे पहायला मिळत आहे.