दीपक चहरची बहीण कोणाशी लग्न करणार? ३५ वर्षीय मालती चहरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:41 IST2026-01-04T10:40:55+5:302026-01-04T10:41:47+5:30
Malti Chahar Marriage : ३५ वर्षीय मालती चहरने आपल्या लग्नाबाबत आणि एमएस धोनीसोबतच्या खास नात्याबद्दल मोठे विधान केले आहे. क्रिकेटरशी लग्न का करणार नाही, याचे कारण तिने स्पष्ट केले. वाचा सविस्तर.

दीपक चहरची बहीण कोणाशी लग्न करणार? ३५ वर्षीय मालती चहरचा मोठा खुलासा
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आणि 'बिग बॉस १९' मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मालती चहर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाची ३५ वर्षे ओलांडली असली तरी मालतीने अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही. मात्र, "मी कधीही कोणत्याही क्रिकेटरशी लग्न करणार नाही," असे विधान करून तिने सर्वांना थक्क केले आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालतीने यामागचे रंजक कारण सांगितले. ती म्हणाली, "माझ्या आयुष्यात लहानपणापासून क्रिकेट खूप जास्त झाले आहे. माझे वडील क्रिकेट कोच आहेत, भाऊ क्रिकेट खेळतो, घराकडे येणारी पाहुणी मुलंही क्रिकेटच खेळत असतात. जर माझ्या आयुष्यात नवरा म्हणूनही क्रिकेटर आला, तर पुन्हा तेच घडेल. मला माझ्या प्रोफेशनमधील किंवा इतर क्षेत्रातील जोडीदार हवा आहे."
एमएस धोनीसोबतचे खास नाते
मालती चहरचे महेंद्रसिंह धोनीसोबतचे नाते अतिशय जवळचे आहे. ती धोनीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यांदरम्यान ती अनेकदा धोनीला 'चिअर' करताना दिसली आहे. "माझ्यासाठी माही भाई हा केवळ एक खेळाडू नाही, तर तो माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्याचा शांत स्वभाव आणि सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती मला खूप प्रेरणा देते," असेही तिने आवर्जून सांगितले.
दीपक चहरसोबतच्या नात्यात दुरावा?
दीपक चहरच्या लग्नानंतर मालती आणि दीपक यांच्यातील नात्यात काहीसा बदल झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना तिने मान्य केले की, लग्नानंतर समीकरणे बदलतात, पण त्यांच्यातील प्रेम आणि आदर आजही कायम आहे.