काम नाही तर पर्सनल लाईफला बनवलं कमाईचं साधन! पबमध्ये फ्री ड्रिंक्ससाठी Malaika नं केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 10:10 AM2022-12-31T10:10:00+5:302022-12-31T10:11:22+5:30

Moving In With Malaika: रियालिटी शो 'मूविंग इन विथ मलायका'ची एक क्लिप सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात मलाइका एका रेस्टोरन्ट अथवा पबमध्ये टेबलवर चढून डान्स मूव्ह दाखवताना दिसत आहे.

Malaika arora shoes sexy dance moves for free drinks at the pub in goa video viral | काम नाही तर पर्सनल लाईफला बनवलं कमाईचं साधन! पबमध्ये फ्री ड्रिंक्ससाठी Malaika नं केलं असं काही

काम नाही तर पर्सनल लाईफला बनवलं कमाईचं साधन! पबमध्ये फ्री ड्रिंक्ससाठी Malaika नं केलं असं काही

googlenewsNext

आपण फ्री ड्रिंक्ससाठी पबमधील टेबलवर चढून डान्स केल्याचा खुलासा मलाइका अरोराने (Malaika Arora) नुकताच तिच्या मूविंग इन विद मलाइका शो मध्ये केला. मूविंग इन विद मलाइका या शोवरून मलाइका आधीपासूनच ट्रोल होत आहे. सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे, की मलाइकाकडे आता कुठलेही काम राहिलेले नाही. यामुळेच ती वैयक्तीक आयुष्याताल सिक्रेट्स आणि घरातील वादांचा सहारा घेत पैसे कमवत आहे.

मलाइकाचा डान्स व्हिडिओ व्हायरल -
रियालिटी शो 'मूविंग इन विथ मलायका'ची एक क्लिप सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात मलाइका एका रेस्टोरन्ट अथवा पबमध्ये टेबलवर चढून डान्स मूव्ह दाखवताना दिसत आहे. मलाइका अरोराची ही स्टाइल बघून अनेक चाहते खुश होत आहेत. तर काही नेटीझन्स तिला जबरदस्त ट्रोल करत आहेत.  

फ्री ड्रिंक्ससाठी मलाइकाचा डान्स - 
मलाइका अरोराने या शो दरम्यान सांगते की, ती आपली नाराज बहिणी अमृता अरोराला शांत करण्यासाठी गोव्याला जाते. शो दरम्यान दिसून आले, की अमृता मलाइकाला चॅलेन्जच्या अंदाजातात म्हणते, चल तू तुझ्या स्टाईलने आण चार्मची जादू दाखवून आम्हाला फ्री ड्रिंक्स पाजवून दाखव. मलाइका देखील हे चालेन्ज स्वीकारते आणि बार मालकाकडे जाते.

मलाइका अरोरा बार मालकाला म्हणते, माझी पर्स विसली आहे आणि आम्हाला येथे चांगले वाटत आहे. जर आपण... यावर बार मालक म्हणतो, आपण खरोखरच आपली पर्स विसला आहात की, आणखी काही कारण आहे. मलाइका म्हणते, की ती खरचच पर्स विसरून आली आहे. यावर बार मालक म्हणतो, की माझी एक अट आहे, आपल्याला जे हवे ते ड्रिंक आम्ही देऊ, आप यासाठी आपल्याला काही करावे लागेल. बार मालकाच्या अटीनंतर, फ्री ड्रिंक्ससाठी मलाइका अरोरा बार टेबलवर चढून मूव्ह दाखावताना दिसते.

Web Title: Malaika arora shoes sexy dance moves for free drinks at the pub in goa video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.