मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:05 IST2025-11-04T10:04:11+5:302025-11-04T10:05:12+5:30
मलायकासोबत कॉन्सर्टमध्ये दिसलेल्या तरुणाची ओळख समोर

मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
मलायका अरोरा वयाच्या ५० व्या वर्षीही आपल्या फिटनेस आणि कमाल लूक्सने सर्वांना घायाळ करते. मलायका दिवसेंदिवस आणखी तरुणच दिसत आहे अशी प्रतिक्रिया अनेक जण देतात. नुकतीच ती हॉलिवूड गायक एनरिके इग्लेसियासच्या मुंबई येथील कॉन्सर्टमध्ये आली होती. यावेळी मलायकासोबत एक तरुण हँडसम मुलगा दिसला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मलायका पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा या व्हिडिओवरुन सुरु झाल्या. आता त्या 'मिस्ट्री मॅन'ची ओळख समोर आली आहे.
मलायकासोबत कॉन्सर्टमध्ये दिसलेला मुलगा आहे हर्ष मेहता. तो हिरे व्यापारी आहे. हर्ष ३३ वर्षांचा आहे. बेल्जियममध्ये त्याचा डायमंडचा बिझनेस आहे. मलायका आणि हर्ष यांच्यात १७ वर्षांचं अंतर आहे. कॉन्सर्टमध्ये हर्ष आणि मलायका एकमेकांसोबत नाचताना, गाताना आणि गप्पा मारताना दिसत होते. मलायका व्हाईट टँक टॉपमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तर हर्षनेही व्हाईट शर्ट घासत ट्विनींग केलं आहे. हर्ष दिसायला हँडसम असून त्याच्या लूक्सवर तरुणीही भाळल्या आहेत. आता तो खरंच मलायकाला डेट करत आहे का यावर अद्याप दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'फिल्मीसेल्फीज' पेजवर ही माहिती अपलोड करण्यात आली आहे.
मलायका अरोरासोबतच्या मिस्ट्री मॅनची ओळख तर समोर आली. दोघांची भेट नक्की कशी झाली आणि त्यांच्यात मैत्री आहे की आणखी काही या सर्व चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.
मलायकाचं १९९८ सालीच अरबाज खानसोबत लग्न झालं होतं आणि त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. २०१७ साली अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु गेल्या वर्षीच दोघांचं नातं तुटलं.