'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने घेतली THAR! म्हणतो, "आई - बाबांच्या डोळ्यांतला आनंद.."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:34 AM2024-04-17T11:34:08+5:302024-04-17T11:37:39+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने महिंद्रा THAR गाडी विकत घेतली आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

Maharashtrachi hasyajatra fame actor prathamesh shivalkar buy mahindra THAR see photos | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने घेतली THAR! म्हणतो, "आई - बाबांच्या डोळ्यांतला आनंद.."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने घेतली THAR! म्हणतो, "आई - बाबांच्या डोळ्यांतला आनंद.."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडता शो. हास्यजत्रेतील सर्वच अभिनेते सर्वांचे लाडके आहेत. आपल्या विनोदी टायमिंगने या अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. हास्यजत्रेतील विविध अभिनेत्यांनी मेहनतीच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात प्रगती केलीय. अशातच हास्यजत्रेतील अभिनेता प्रथमेश शिवलकरने आलिशान आणि महागडी अशी महिंद्रा THAR विकत घेतलीय.

प्रथमेश शिवलकरने शोरुममधून महिंद्रा THAR घेतानाचे फोटो शेअर केलेत. या फोटोत प्रथमेशचा भाऊ आणि त्याचे आई - बाबाही दिसत आहेत. प्रथमेश आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर  आनंद झळकत आहे. हा फोटो शेअर करुन प्रथमेश लिहितो, "यांजसाठी केला होता अट्टाहास भाग १ MAHINDRA THAR.. हे आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद , समाधान आणि कौतुक ………"

प्रथमेशने घेतलेल्या THAR ची किंमत ११ लाखांहून अधिक आहे.  प्रथमेश शिवलकरबद्दल सांगायचं तर तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लेखन आणि अभिनय या दोन्ही जबाबदारी सांभाळतो. प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश परब या दोघांची जोडी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये लोकप्रिय आहे. प्रथमेश - श्रमेश जोडीने विविध स्कीट एकत्र गाजवले आहेत. प्रथमेशने महिंद्रा THAR ही स्वप्नातली गाडी विकत घेतल्याने त्याच्या आनंदाला उधाण आलं असेल, यात शंका नाही. 

 

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor prathamesh shivalkar buy mahindra THAR see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.