सैफ अली खानला मोठा झटका; १५००० कोटींची संपत्ती सरकार जप्त करण्याची शक्यता, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:41 IST2025-01-22T12:39:55+5:302025-01-22T12:41:06+5:30

अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर तो लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. नुकताच मंगळवारी तो रुग्णालयातून घरी परतला.

Madhya Pradesh High Court lifted a stay on properties valued at Rs 15000 crore linked to Saif Ali Khan's family | सैफ अली खानला मोठा झटका; १५००० कोटींची संपत्ती सरकार जप्त करण्याची शक्यता, जाणून घ्या प्रकरण

सैफ अली खानला मोठा झटका; १५००० कोटींची संपत्ती सरकार जप्त करण्याची शक्यता, जाणून घ्या प्रकरण

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अलीकडेच जीवघेणा हल्ला झाला होता. या संकटातून ते सावरले नाहीत तोवर सैफ अली खानला आणखी एका धक्का बसला आहे. सैफच्या पटौदी घराण्याची वडिलोपार्जित संपत्ती लवकरच केंद्र सरकारच्या नियंत्रणात येऊ शकते. ही सर्व संपत्ती मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे त्याची एकूण किंमत जवळपास १५ हजार कोटी रुपये इतकी आहे. मध्य प्रदेशातील हायकोर्टाने या संपत्ती प्रकरणातील खटल्यावर लावलेली स्थगिती हटवली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया. 

अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर तो लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. नुकताच मंगळवारी तो रुग्णालयातून घरी परतला. त्यातच मध्य प्रदेश हायकोर्टातून त्याच्यासाठी वाईट बातमी आली. सैफ अली खानच्या पटौदी घराण्याची भोपाळ आणि रायसेन येथील वडिलोपार्जित मालमत्ता केंद्र सरकार त्यांच्या नियंत्रणात घेऊ शकते. यावर लावलेले स्टे हायकोर्टाने उठवला आहे ज्यामुळे आता शत्रू मालमत्ता कायदा, १९६८ अंतर्गत केंद्र सरकार ही मालमत्ता अधिग्रहण करू शकते. 

शत्रू संपत्ती नेमकी काय असते?

केंद्र सरकार सैफ अली खान (Saif Ali Khan) ची भोपाळ इथली मालमत्ता शत्रू संपत्ती कायदा १९६८ अंतर्गत जप्त करू शकते. त्यामुळे शत्रू संपत्ती म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं. Enemy Property Act अंतर्गत भारत सरकार अशा लोकांच्या संपत्तीवर दावा करू शकते जे १९४७ फाळणीत पाकिस्तानला गेले आहेत. सैफ अली खानचे पटौदी कुटुंब भोपाळ संपत्तीच्या या श्रेणीत येते. 

मध्य प्रदेश हायकोर्टाने २०१५ साली या प्रकरणावर सुनावणी केली होती. जेव्हा मुंबई स्थित Enemy Property Custodian Office कडून भोपाळच्या नवाबची जमीन सरकारी संपत्ती घोषित करण्यात आली होती. त्यानंतर पटौदी कुटुंबाला नोटीसही जारी करण्यात आली. त्याला सैफ अली खानने हायकोर्टात आव्हान दिले होते आणि या संपत्तीवर स्टे आणला होता. बिझनेस टुडे रिपोर्टनुसार, मागील १३ डिसेंबरला मध्य प्रदेश हायकोर्टात न्या. विवेक अग्रवाल यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून अपील करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला होता परंतु सैफ अली खान अथवा त्याच्या कुटुंबातील कुणीही अद्याप कुठलेही पाऊल उचलले नाही. 

दरम्यान, सैफ अली खानच्या ज्या संपत्तीवर टाच येऊ शकते त्यात भोपाळ आणि रायसेन इथली मालमत्ता आहे. त्यात फ्लॅग स्टाफ हाऊस, नूर उस सबा पॅलेस, दार उस सलाम, हबीबी बंगला, अहमदाबाद पॅलेस, कोहेफिजा यांचा समावेश आहे. फ्लॅग स्टाफ हाऊसमध्ये सैफचं बालपण गेले आहे. १९४७ पर्यंत भोपाळ एक संस्थान होते आणि तिथले हमीदुल्लाह खान हे शेवटचे नवाब होते. ते मंसूर अली खान पटौदी यांचे आजोबा होते आणि त्यांना ३ मुली होत्या. ज्यात आबिदा सुल्तान १९५० साली पाकिस्तानला गेली. दुसरी मुलगी साजिदा सुल्तान भारतात राहतात आणि त्यांनी सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्तिकार अली खान पटौदी यांच्याशी लग्न केले. २०१९ मध्ये साजिदा सुल्तानला कायदेशीर वारसदार म्हणून मान्यता मिळाली आणि सैफ अली खानला संपत्तीमधला एक हिस्सा वारसा संपत्ती म्हणून मिळाली होती. 
 

Web Title: Madhya Pradesh High Court lifted a stay on properties valued at Rs 15000 crore linked to Saif Ali Khan's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.