Lokmat Most Stylish Awards 2021: सिद्धार्थ जाधव मोस्ट स्टायलिश एन्टरटेनर; मराठमोळ्या अभिनेत्याचा खास सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 22:03 IST2021-12-02T21:56:53+5:302021-12-02T22:03:07+5:30
Lokmat Most Stylish Awards 2021: मराठी प्रेक्षकांना आपल्या वाटणाऱ्या कलाकाराचा लोकमतकडून सन्मान

Lokmat Most Stylish Awards 2021: सिद्धार्थ जाधव मोस्ट स्टायलिश एन्टरटेनर; मराठमोळ्या अभिनेत्याचा खास सन्मान
मुंबई: आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सन्मान करण्यात आला. सिद्धार्थला मोस्ट स्टायलिश एन्टरटेनर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मराठी इंडस्ट्रीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या सिद्धार्थनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
सिंबा, सूर्यवंशी यासारख्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ जाधवनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्याच्या या भूमिका रसिक प्रेक्षकांना आवडल्या. मराठीत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारणारा सिद्धार्थ गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्येही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. सिद्धार्थची एनर्जी आणि कामाबद्दलची त्याची निष्ठा कायमचा कौतुकाचा विषय ठरली आहे. बॉलिवूडमध्ये जाऊन नाव कमावणारा सिद्धार्थ अनेकांना आपला, आपल्यातलाच एक वाटतो हे त्याच्या स्वभावाचं मोठं वैशिष्ट्य.