Lokmat MSA 2021: मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेते; लोकमतकडून विशेष सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 22:40 IST2021-12-02T22:40:10+5:302021-12-02T22:40:36+5:30
Lokmat MSA 2021: एकापेक्षा एक सुंदर भूमिका साकारणाऱ्या फॅमिली मॅनचा गौरव

Lokmat MSA 2021: मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेते; लोकमतकडून विशेष सन्मान
मुंबई: आपल्या उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे मनोज वाजपेयी. बॉलिवूडप्रमाणेच अन्य भाषिक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारे मनोज वाजपेयी आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. फॅमिली मॅन वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारे मनोज वाजपेयी यांच्या अभिनय कौशल्याचं कायमच विविध स्तरांमधून कौतुक केलं जातं. विशेष म्हणजे त्यांच्या या अभिनय शैलीचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डनं त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
मोठ्या पडद्यासोबतच ओटीटीवरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवणाऱ्या मनोज वाजपेयींचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेता पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स अवॉर्ड्स सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. फॅमिली मॅन वेबसीरिजच्या सीझन १ आणि सीझन २ मध्ये मनोज वाजपेयींनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं. या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीची भूमिका अतिशय सक्षमपणे साकारली.