Lokmat DIA: प्रिया बापटचा बेस्ट सेलिब्रिटी इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं सन्मान; लोकमतकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 14:24 IST2021-12-02T14:23:53+5:302021-12-02T14:24:43+5:30
Lokmat Digital Influencer Awards: मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.

Lokmat DIA: प्रिया बापटचा बेस्ट सेलिब्रिटी इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं सन्मान; लोकमतकडून गौरव
लोकमत मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन लोकमतच्या वतीने मुंबईत करण्यात आलं. या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन तसंच उद्योगजगतामधील स्टाईलिश मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भूमिका कोणतीही असो तिला न्याय देणारी अभिनेत्री म्हणजे मराठमोळी प्रिया बापट मराठीसह हिंदी सिनेमा, वेबसिरीज मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रियाने अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. प्रिया बापटचे फॅन्स तिच्या अभिनयासोबतच तिच्या अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. त्यामुळेच प्रिया बापट Lokmat's BBest Celebrity influencer- Regional Cinema पुरस्काराची मानकरी ठरली आहे.