Lokmat DIA: मिस मालिनीचा बेस्ट सेलिब्रिटी अँड लाईफस्टाईल इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:05 IST2021-12-02T12:56:09+5:302021-12-02T13:05:49+5:30
Lokmat Digital Influencer Awards: अल्पावधीतच सेलिब्रेटी फॅशन जगतात आपल्या खास स्टाइलने धुमाकूळ घालणारं नाव मिस मालिनी म्हणजेच मालिनी अग्रवाल. फॅशन जगतात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले.

Lokmat DIA: मिस मालिनीचा बेस्ट सेलिब्रिटी अँड लाईफस्टाईल इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं गौरव
अल्पावधीतच सेलिब्रेटी फॅशन जगतात आपल्या खास स्टाइलने धुमाकूळ घालणारं नाव मिस मालिनी म्हणजेच मालिनी अग्रवाल. फॅशन जगतात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच मिस मालिनीला या पुरस्कार सोहळ्यात Best Celebrity and lifestyle influencer या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बॉलीवूडच्या गॉसिपपासून लेटेस्ट फॅशन ट्रेंडपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती देणारी मालिनी अग्रवाल. सुरुवातीपासून तिला ट्रॅव्हलिंग आणि फॅशनची आवड होती. तिने आपला छंद जोपासला. याचं छंदाचं तिने तिच्या व्यवसायात रुपांतर केलं. मालिनी तिच्या 'Mismalini.com' या ब्लॉगवरून दरवर्षी करोडोंची कमाई करते.
missmalini.com या वेबसाईटवर सेलिब्रेटींच्या हटके फॅशनवर आधारित लेख तसेच बॉलिवूडमधले गॉसिप्स यावर पब्लिश करण्यात येतात.
मालिनीचे ब्लॉग केवळ वेबसाईटवरच पब्लिश होतात असे नाही. फेमिना, ग्रेजिया, हार्पर्स बाजार, ग्लॅमर्स.कॉम आणि एली मॅगजीन्स अशा बड्या फॅशन मॅगेझिनमध्येही पब्लिश होत असतात.
मालिनी लॅक्मे फॅशन वीक, ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर आणि इंडिया रिसॉर्ट फॅशन वीक यांसारख्या लोकप्रिय फॅशन शोसाठी ती अधिकृत ब्लॉगर होती. विशेष मालिनी अग्रवालने भारतातच आपली ओळख निर्माण केली असे नाही.मालिनी यांना ब्लॉग लिहीण्यासाठी आता परदेशातून कव्हरेजसाठी आमंत्रण मिळतात असतात.