LMOTY 2018: तैमूरने क्रिकेटपटू व्हावं असं करीनाला वाटतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 20:37 IST2018-04-10T20:36:46+5:302018-04-10T20:37:32+5:30
मी माझी मतं तैमूरवर लादणार नाही. त्याला ज्या क्षेत्रात जावंस वाटतं, त्या क्षेत्रामध्ये त्याने काम करावं.

LMOTY 2018: तैमूरने क्रिकेटपटू व्हावं असं करीनाला वाटतं
ठळक मुद्देतैमूरने भविष्यात काय व्हावं, हे दस्तुरखुद्द करीनानेच सांगितलंय आणि तेही ‘ लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८ ‘ या पुरस्कार सोहळ्यात.
मुंबई : काही दिवसांपासून करीना कपूरचा मुलगा तैमूर याच्या प्रत्येक गोष्टीवर लोकं लक्ष ठेवून असतात. तो एवढा लहान असताना त्याच्याबद्दल एवढ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, तर भविष्यात काय होईल, याचा विचारही करवत नाही. पण तैमूरने भविष्यात काय व्हावं, हे दस्तुरखुद्द करीनानेच सांगितलंय आणि तेही ‘ लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८ ‘ या पुरस्कार सोहळ्यात.
तैमूरने मोठं होऊन काय व्हावं असं तुला वाटतं, असा प्रश्न करीनाला विचारला गेला होता. त्यावर करीना म्हणाली की, “ मी माझी मतं त्याच्यावर लादणार नाही. त्याला ज्या क्षेत्रात जावंस वाटतं, त्या क्षेत्रामध्ये त्याने काम करावं. पण मला विचाराल, तर तैमूरने क्रिकेटपटू व्हावं, अशी माझी इच्छा आहे. “