"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:41 IST2025-03-04T10:40:21+5:302025-03-04T10:41:22+5:30

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची ऑफस्क्रीन-ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

Little Genelia takes special name for Riteish Deshmukh, video Goes viral | "समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा

"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख (Genelia Dsouza-Deshmukh) बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची ऑफस्क्रीन-ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्यांचे फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. नुकतेच झी चित्र गौरवमध्ये रितेश देशमुखने हजेरी लावली होती. मात्र यावेळी जिनिलिया सहभागी झाली नव्हती. ती नसली तरी रितेशसोबत छोटी जिनिलिया पाहायला मिळाली होती तीही साताऱ्याची. छोट्या जिनिलिया आणि रितेश या दोघांनीही एकमेकांसाठी यावेळी उखाणा घेतला. इतकंच नाही तर त्या दोघांची केमिस्ट्रीदेखील सर्वांना खूपच भावली.

झी मराठीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या मंचावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, छोट्या जेनीलियाचा तोरा पहाणार, तेव्हा रितेशही अवाक होणार...! या व्हिडीओत मंचावर रितेश देशमुख, छोटी जिनिलिया आणि सूत्रसंचालक अमेय वाघ पाहायला मिळत आहे. 


या व्हिडीओत छोटी जिनिलिया रितेशला म्हणतेय की, मोठी जिनिलिया आली तर या छोट्या जिनिलियाला विसरलंत की काय? त्यावर अमेय वाघ म्हणाला की, काय काय मी पण जिनिलिया काय... त्यावर छोटी जिनिलिया म्हणाली की, व्हयं मी सातारची जिनिलिया. तुम्ही भी या साताऱ्याला मस्त रानात मटणाची पार्टी करुयात. त्यावर रितेश म्हणाला की, मटण खात नाही ओ. त्यावर छोटी जिनिलिया म्हणाली की, मग तुमच्यासाठी पिझ्झा पार्टी अन् उसाचा रस. अमेय म्हणाला की, सगळं तुम्हीच ठरवणार का हो. त्यावर छोटी जिनिलिया म्हणाली की, जिनिलिया कुठली भी असू दे सगळं तिच ठरवते. हो ना रितेश सर. त्यावर रितेश म्हणाला की, हो हो अगदी खरंय. त्यावर अमेय म्हणाला की, सिम कार्ड मायक्रो असू दे किंवा मॅक्रो टॉकटाइम तेवढाच असतो.

रितेश आणि छोट्या जिनिलियाने एकमेकांसाठी घेतला उखाणा
पुढे छोटी जिनिलिया रितेशला म्हणाली, घ्या उखाणा. त्यावर रितेश म्हणाला की, त्या जिनिलियासमोर मी नेहमी असतो मी म्युट, मी नेहमी असतो मी म्युट. ही जिनिलियाला पाहून वाटतं सो क्युट... सो क्युट. त्यावर छोटी जिनिलिया म्हणते, इश्श..! जावा तिकडं. तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना आलं हसू. मग छोट्या जिनिलियानेही घेतला उखाणा. ती म्हणाली की, समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...रितेश रावांचं नाव घेते चला रानात करुयात पिझ्झाची पार्टी. तिचा उखाणा ऐकून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. त्यानंतर रितेश आणि तिने बुरुम बुरुम गाण्यावर डान्सही केला. 

Web Title: Little Genelia takes special name for Riteish Deshmukh, video Goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.