जाणून घ्या या बॉलिवूडकरांचे असे आहे या कलाकारांसह नाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 19:24 IST2017-04-17T13:54:28+5:302017-04-17T19:24:28+5:30
''कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'' बॉलिवूडमधल्या क्षणिक नात्यांचं वर्णन करणारंपेज थ्री सिनेमातलं हे गाणं. मात्र बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकारांचे ...
.jpg)
जाणून घ्या या बॉलिवूडकरांचे असे आहे या कलाकारांसह नाते
आमिर खान आणि अदिती राव हैदरी
मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्यात असंच काहीसे नातं आहे. अदिती ही आमिरची पत्नी किरण रावची चुलत बहिण आहे. या नात्यामुळे अदिती आमिरची मेहुणी आहे.
सोनम कपूर आणि रणवीर सिंह
सोनम कपूर आणि रणवीर सिंह यांच्यात भावाबहिणीचं नातं आहे. कारण सोनम कपूरची आजी रणवीर सिंहच्या आजोबांची सख्खी बहिण आहे.
अमिताभ बच्चन आणि राजीव वर्मा
बिग बी अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांची बहिण रिटा बहादुरी यांचे पती म्हणजेच अभिनेता राजीव वर्मा. या नात्यानुसार बिग बी आणि राजीव वर्मा एकमेकांचे साढू झालेत.
मोहनीश बहल आणि अजय देवगण
बॉलिवूडचे अभिनेता मोहनीश बहल याची आई नुतन आणि अभिनेत्री काजोल यांची आई तनुजा या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या नात्यामुळे मोहनीश आणि काजोल बहिण भाऊ आहेत. या नात्यानुसार काजोलचा पती अजय देवगण म्हणजे मोहनीश बहेल याचा मेहुणा म्हणावा लागेल.
शरमन जोशी आणि प्रेम चोप्रा
बॉलिवूडचा अभिनेता शरमन जोशी आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक तसंच ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा यांच्यातही वेगळं नातं आहे. शरमन हा प्रेम चोप्रा यांचा जावई आहे.
शेखर कपूर आणि देव आनंद
दिग्दर्शक शेखर कपूर हे अभिनेता देव आनंद यांच्यात मामा भाच्याचं नातं आहे. शेखर हे देव आनंद यांचे भाचे आहेत.
मिथुन चक्रवर्ती आणि करीना
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांची पहिली पत्नी गीता बाली यांची बहिण म्हणजे योगिता बाली. योगिता बाली यांचं लग्न अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्याशी झालं. या नात्यामुळे मिथुन हे कपूर खानदानचे जावई झालेत. तर अभिनेत्री करीना कपूरचे मावशे म्हणावे लागतील.
आलिया भट आणि इमरान हाशमी
अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री आलिया भट एकमेकांचे मावस भाऊ आहे.या नात्यामुळेच इमरानने आलिया भटसोबत सिनेमा साईन करण्यास नकार दिला होता. आपल्या बहिणीसह रोमँटिक भूमिका कसा साकारु असा सवाल इमराननं उपस्थित केला होता.