'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये दिसणार या अभिनेत्री, अभिनेत्रींचे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:16 IST2018-04-11T15:40:00+5:302018-04-11T16:16:26+5:30

स्टुडंट ऑफ द इअर सिनेमात आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केलं होतं. आता या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत असणार आहे.

The leading ladies of Karan Johar Student Of The Year 2 is Ananya Pandey and Tara Sutaria | 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये दिसणार या अभिनेत्री, अभिनेत्रींचे पोस्टर रिलीज

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये दिसणार या अभिनेत्री, अभिनेत्रींचे पोस्टर रिलीज

दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इअर 2' सिनेमाबाबत चांगलाच उत्साही आहे. हा सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमाचा सिक्वल असणार आहे. स्टुडंट ऑफ द इअर सिनेमात आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केलं होतं. आता या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत असणार आहे.


या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून यातील अभिनेत्रींचा पहिला लूक रिलीज करण्यात आलाय. 


धर्मा प्रॉडक्शनकडून नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहेत. करण जोहरने दोन्ही मुख्य अभिनेत्रींचं पोस्टर रिलीज केलंय. या सिनेमात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी दिसणार आहेत. 


या सिनेमाचं शूटिंग देहरादूनमध्ये सुरु झालं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा हा करणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत असेल हे आधीच जाहीर करण्यात आले होते. पण अभिनेत्रींची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. 

Web Title: The leading ladies of Karan Johar Student Of The Year 2 is Ananya Pandey and Tara Sutaria