'लाखात एक...' मालिकेत सूर्याचा पुष्पा लूक पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले- "पैसे मिळतात म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:02 IST2025-05-28T13:01:37+5:302025-05-28T13:02:28+5:30
सूर्याचा पुष्पास्टाइल लूक केल्याचं दिसत आहे. हिरवी साडी आणि गळ्यात दागिने घालून, कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करत असल्याचं दिसत आहे. मात्र, चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार रुचलेला नाही.

'लाखात एक...' मालिकेत सूर्याचा पुष्पा लूक पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले- "पैसे मिळतात म्हणून..."
'लाखात एक आमचा दादा' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सूर्या दादा आणि तुळजाची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडते. सुरुवातीपासूनच मालिकेवर प्रेक्षक प्रेम करतात. सध्या 'लाखात एक आमचा दादा' मालिका रंजक वळणावर आहे. मालिकेत डॅडींचा खरा चेहरा लवकरच सूर्यासमोर येणार आहे. तर दुसरीकडे बहीण तेजूसाठी सूर्या रौद्रअवतार धारण करणार आहे.
तेजूपुढे शत्रूचा खरा चेहरा आला आहे. मात्र तिच्या पोटात शत्रूचं बाळ वाढत आहे. पण, हे बाळ माझं नसल्याचा आरोप शत्रूने तेजूवर केला आहे. तेजूवर खोटे आरोप करून शत्रू तिला सत्याची परिक्षा द्यायला लावतो. तेजूसोबत शत्रूला ही परिक्षा द्यायला सूर्या भाग पाडतो. त्यानंतर तो देवीसमोर तांडव करताना दिसत आहे. यासाठी सूर्याचा पुष्पास्टाइल लूक केल्याचं दिसत आहे. हिरवी साडी आणि गळ्यात दागिने घालून, कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करत असल्याचं दिसत आहे. मात्र, चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार रुचलेला नाही.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील या प्रोमो व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "पुष्पाचं कॉपी केलं आहे", "फालतुगिरी पैसे मिळतात म्हणून कलाकार काहीही करतात", "सस्ता पुष्पा?" अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.
"अजून अंधश्रद्धा पसरवा", "पुष्पाचं पाहून केलं असं वाटतंय", असंही काहींनी म्हटलं आहे.
दरम्यान, 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत अभिनेता नितिश चव्हाण सूर्यादादाच्या भूमिकेत आहे. तर मृण्मयी गोंधळेकर तुळजाची भूमिका साकारत आहे. मालिकेत गिरीष ओक डॅडींच्या भूमिकेत आहेत. तर कोमल मोरे, समृद्धी साळवी, जुई तनपुरे, सुमेधा दातार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.