हृषिकेश जोशींच्या लेखणीतील 'बोलविता धनी' नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:42 IST2025-12-06T16:41:43+5:302025-12-06T16:42:16+5:30

Kshitish Date : प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. या नाटकात अभिनेता क्षितीश दाते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Kshitish Date is all set for the new play 'Bolvita Dhani' written by Hrishikesh Joshi. | हृषिकेश जोशींच्या लेखणीतील 'बोलविता धनी' नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज

हृषिकेश जोशींच्या लेखणीतील 'बोलविता धनी' नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज

प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या 'बोलविता धनी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दातेने नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

क्षितीशने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, "या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे 'बोलविता धनी' या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो." क्षितीशच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, "बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो."

"हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं''

हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना क्षितीश म्हणाला, "मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची 'नांदी', 'संयुक्त मानअपमान' ही सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय आता सुरू असलेल्या 'मी व्हर्सेस मी' या नाटकातही आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळे जेव्हा त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं. नाटक काय आहे, वाचन कधी आहे, असल्या कोणत्याही गोष्टीत मी पडलो नाही; त्याने विचारलं त्याच क्षणी मी हो बोललो."

'बोलविता धनी'चा शुभारंभ

क्षितीशला खात्री आहे की, १३ जणांना एकत्रित पाहण्याची जी मजा असते ती या नाटकात नक्कीच अनुभवायला मिळेल आणि 'बोलविता धनी' नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.

Web Title : क्षितिश दाते हृषिकेश जोशी के 'बोलविता धनी' नाटक के लिए तैयार।

Web Summary : क्षितिश दाते, हृषिकेश जोशी के 'बोलविता धनी' में दोहरी भूमिका निभाएंगे। उन्होंने जोशी के लेखन और नाटक के छिपे हुए प्रभावक की अवधारणा की सराहना की। पुणे और मुंबई में दिसंबर में प्रीमियर।

Web Title : Kshitish Date gears up for Hrishikesh Joshi's 'Bolvita Dhani' play.

Web Summary : Kshitish Date stars in Hrishikesh Joshi's 'Bolvita Dhani', playing dual roles. He praises Joshi's writing and the play's concept of a hidden influencer. Premieres in Pune and Mumbai this December.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.