क्रिती सनॉनच्या घरी वाजणार घरी सनई चौघडे, धाकटी बहीण नुपूर 'या' गायकाशी करणार लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:40 IST2025-12-03T17:40:39+5:302025-12-03T17:40:59+5:30
क्रिती सनॉन हिच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे.

क्रिती सनॉनच्या घरी वाजणार घरी सनई चौघडे, धाकटी बहीण नुपूर 'या' गायकाशी करणार लग्न!
Kriti Sanon’s Sister Nupur Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. क्रितीची धाकटी बहीण आणि अभिनेत्री नुपूर सनॉन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ती गायक स्टेबिन बेन याच्याशी लग्न करणार आहे. हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मोठी बहीण म्हणून क्रिती या सोहळ्यासाठी खूप उत्साहित असणार यात शंका नाही. क्रिती ही 'मिमी' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. सध्या तिचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट थिएटर गाजवतोय.
'बॉलिवूड बबल'च्या वृत्तानुसार, नुपूर आणि स्टेबिन बेन यांचा शाही विवाह सोहळा ८ ते ९ जानेवारी २०२६ मध्ये पार पडण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी रोजी मेहंदी आणि संगीत समारंभ होणार असून ९ जानेवारीला लग्न पार पडेल. हे सर्व विधी पारंपारिक राजस्थानी शैलीत होतील, असे सांगितले जात आहे. हा विवाह सोहळा उदयपूरमधील आलिशान फेअरमोंट पॅलेसमध्ये होणार आहे.
नुपूर ही अक्षय कुमारसोबतच्या 'फिलहाल' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजले आणि नुपूरला खूप दाद मिळाली होती. नुपूर ही डिस्ने+ हॉटस्टारच्या टेलिव्हिजन मालिका 'पॉप कौन?'मध्ये ती दिसली होती. यानंतर रवी तेजासोबत तेलगू चित्रपटात झळकली होती. तर स्टेबिन बेन त्यांच्या 'मेरा मेहबूब,' 'थोडा थोडा प्यार,' आणि 'बारिश' या गाण्यांसाठी ओळखले जातो. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात.