एका सर्जरीमुळे बदलले या अभिनेत्रीचे आयुष्य, सर्जरी बिघडल्याने गेली बॉलिवूडपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 06:00 AM2021-06-07T06:00:00+5:302021-06-07T06:00:02+5:30

ही अभिनेत्री तिच्या दिसण्यावर खूश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली

Koena Mitra said Doctors gave up, said only prayers could work | एका सर्जरीमुळे बदलले या अभिनेत्रीचे आयुष्य, सर्जरी बिघडल्याने गेली बॉलिवूडपासून दूर

एका सर्जरीमुळे बदलले या अभिनेत्रीचे आयुष्य, सर्जरी बिघडल्याने गेली बॉलिवूडपासून दूर

googlenewsNext
ठळक मुद्देकोएना तिच्या दिसण्यावर खूश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी देखील केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला.

कोएना मित्राचा आज वाढदिवस असून ती गेली अनेक वर्षं बॉलिवूडपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती बिग बॉस या कार्यक्रमात झळकली होती.

'मुसाफिर', 'एक खिलाडी एक हसीना', 'अपना सपना -मनी मनी' यांसारख्या चित्रपटात कोएना झळकली. मात्र कोएनाची कारकिर्द फारशी यशस्वी ठरली नाही. बॉलीवूडमध्ये अपयश आल्यानंतर तामिळ, बंगाली चित्रपटात तिने काम केले. २०१५ साली कोएना एका बंगाली चित्रपटात झळकली. मात्र त्यानंतर ती चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर गेली.

कोएना तिच्या दिसण्यावर खूश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी देखील केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे कोएनाचा चेहरा खराब झाला. कधीकाळी कोएनाकडे काही आयटम नंबर होते, मात्र सर्जरीनंतर दिग्दर्शकांनी कोएनाकडे पाठ फिरवली. कोएनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं. तिच्यावर घरी बसण्याची वेळ आली. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली.

घरातून बाहेर पडणंही कोएनासाठी कठीण बनलं. सर्जरीमुळे तिचा चेहरा खराब झाला. औषधं आणि प्रार्थनाच काही चमत्कार करेल असंही डॉक्टरांनी कोएनाला सांगितलं. तरी कोएनाने हिंमत हरली नाही. त्या चेहऱ्यासह ती घराबाहेर पडू लागली. जे घडलं ते मान्य करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र लोक तिला स्वीकारण्यास तयार नव्हते. संकटसमयी तिच्या मित्रांनीही तिची साथ सोडली. चेहरा ठीक करण्यासाठी कोएनाने आणखी काही सर्जरीसुद्धा केल्या. मात्र त्यात यश आलं नाही.

Web Title: Koena Mitra said Doctors gave up, said only prayers could work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.