आमिरची पहिली पत्नी रीनाबरोबर कसं आहे किरण रावचं नातं? म्हणाली, "मी तिच्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:45 PM2024-02-03T13:45:20+5:302024-02-03T13:51:28+5:30

किरण रावने रिना दत्ताबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. 

kiran rao talk about her relationship between aamir khan first wife reena dutta | आमिरची पहिली पत्नी रीनाबरोबर कसं आहे किरण रावचं नातं? म्हणाली, "मी तिच्यासोबत..."

आमिरची पहिली पत्नी रीनाबरोबर कसं आहे किरण रावचं नातं? म्हणाली, "मी तिच्यासोबत..."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकतंच आमिर खानची लेक आयरा खानचा विवाहसोहळा पार पडला. आयराच्या लग्नात पहिल्यांदाच आमिरचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं. आमिरच्या दोन्ही एक्स पत्नींनी आयराच्या लग्नाला हजेरी लावली होती. आयराच्या लग्नात आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव एकत्र दिसल्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किरण रावने रिना दत्ताबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. 

किरण रावने 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. किरण म्हणाली, "माझं कुटुंबीयही आयराच्या लग्नासाठी उपस्थित होतं. हे होईल असा मी विचारही केला नव्हता. पण, आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी एकत्र भेटतो. आम्ही एकाच सोसायटीमध्येही राहतो. माझ्या सासूबाई वरच्या रूममध्ये राहतात. रीनाचं घर माझ्या बाजूलाच आहे. आणि नुझहत(आमिरची बहीण) जवळच राहते. आम्ही माणूस म्हणून एकमेकांना आवडतो. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायलाही जातो. मी रीना आणि नुझहतबरोबरही हँग आऊट करते." 

"घटस्फोट घेतल्यानंतरही ही नाती तुम्ही सोडू शकत नाही. मी आणि आमिर वेगळे झालो असलो, तरीही आम्ही एक कुटुंब आहोत. जर तुमचं लग्न तुटल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुमची नाती बनली नसतील. तर तुम्ही खूप काहीतरी गमावत आहात. कारण, इतकी वर्ष तुम्ही या नात्यांना दिलेली असतात. या १५ वर्षात आम्ही आयुष्यभराचा अनुभव घेतला आहे. विश्वास, प्रेम आणि आदर यामुळेच आमचं नातं बहरलं. आता आम्ही पतीपत्नी जरी नसलो तरी आझादचे आईवडील आहोत आणि एकमेकांचं कुटुंब आहोत," असंही पुढे किरण रावने सांगितलं. 

दरम्यान, आमिर खानने १९८६ साली रीना दत्ताशी लग्न केलं होतं. १६ वर्षांच्या संसारानंतर ते वेगळे झाले. त्यांना आयरा आमि जुनैद ही दोन मुलं आहेत. त्यानंतर आमिरने २००२ साली किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. २०२१मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना आझाद हा मुलगा आहे. 

Web Title: kiran rao talk about her relationship between aamir khan first wife reena dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.