KBC 13 : सुरक्षा गार्डचा मुलगा बनला करोडपती, तापसी पन्नूचं 'साहिल'साठी खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 23:42 IST2021-10-21T23:22:30+5:302021-10-21T23:42:09+5:30

साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

KBC 13 : Sahil, the son of a security guard, became a millionaire, Tapsi Pannu also made an offer in KBC | KBC 13 : सुरक्षा गार्डचा मुलगा बनला करोडपती, तापसी पन्नूचं 'साहिल'साठी खास ट्विट

KBC 13 : सुरक्षा गार्डचा मुलगा बनला करोडपती, तापसी पन्नूचं 'साहिल'साठी खास ट्विट

ठळक मुद्देविशेष म्हणजे साहिल यांची आवडती अभिनेत्री असलेल्या तापसी पन्नूनेही साहिलचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय.

मुंबई - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या साहिल आदित्य अहिलवार या युवकाने कौन बनेगा करोडपतीच्या 13 व्या सिझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकून यंदाच्या सीझनमधील दुसरा करोडपती होण्याचा मान पटकावला आहे. साहिल हे 20 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसले होते. आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर त्यांनी 1 करोड रुपये जिंकून दाखवले. आज, 21 ऑक्टोबर रोजी 7 कोटी रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, साहिल यांनी शानदार खेळ केल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे साहिल यांची आवडती अभिनेत्री असलेल्या तापसी पन्नूनेही साहिलचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय. तसेच, कधी भेट झाल्यास छोले भटुरे आवर्जून खाऊयात, असेही तापसीने म्हटले आहे. 

या खेळात अमिताभ यांनी साहिलला आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, साहिल यांनी तापसी पन्नू हिचं नाव घेत तीच माझा क्रश असल्याचं म्हटलं. तसेच, तापसीला काय आवडतं असंही त्यांनी विचारलं होतं. त्यावर, तापसीने मला छोले भटुरे आवडत असल्याचे सांगितले. दरम्यान, साहिल सध्या बी.ए. पदवीचे शिक्षण घेत आहेत, त्याचे वडिल सुरक्षा गार्ड असून नोएडा येथे 15 हजार रुपयांची नोकरी करतात. तर, साहिलने नवोदय विद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. 
 

Web Title: KBC 13 : Sahil, the son of a security guard, became a millionaire, Tapsi Pannu also made an offer in KBC