कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 11:20 AM2021-11-05T11:20:00+5:302021-11-05T11:20:00+5:30

Katrina Kaif: लवकरच कतरिनाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

katrina kaif underwent facial surgery seeing the changed look the troll said | कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. गेल्या कित्येक वर्षांपासून कतरिना तिचा फिटनेस मेंटेंन करुन आहे. लवकरच कतरिनाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कतरिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी तिच्या बदलेल्या लूकमुळे तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यात किंचितसा बदल जाणवत आहे. ज्यामुळे कतरिनाने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

अलिकडेच कतरिनाने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केलं. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यात झालेला बदल चाहत्यांना फारसा रुचलेला नाही. ज्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.  यात अनेकांनी तिला बोटोक्स ट्रीटमेंट (Botox Treatment) घेतल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी, तिने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं आहे.

कतरिनाने खरंच केलीये का Botox Treatment? 

कतरिनाने  Botox Treatment घेतल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. परंतु, कतरिनाने कधीही याविषयी कोणतं स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या कतरिना सूर्यवंशी चित्रपटात झळकणार असून यात अक्षय कुमार, रणवीर सिंह, अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट 5200 पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
 

Web Title: katrina kaif underwent facial surgery seeing the changed look the troll said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.