कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:06 IST2025-10-07T13:06:14+5:302025-10-07T13:06:44+5:30
कतरिना कैफच्या बेबी शॉवरची बातमी काल सगळीकडे पसरली

कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
अभिनेत्री कतरिना कैफ ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्याच्या सुरुवातीला बाळाला जन्म देणार आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी ती आई होणार आहे. कतरिना आणि विकी कौशलने फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. तर कालच कतरिनाचं बेबी शॉवरही झालं. मोजक्याच लोकांच्या उपस्थिती कतरिनाचं डोहाळजेवण पार पडलं. या बेबी शॉवरसाठी खास शेफ ला बोलवण्यात आलं होतं.
कतरिना कैफच्या बेबी शॉवरची बातमी काल सगळीकडे पसरली. काल ६ ऑक्टोबर रोजी घरीच तिचं खास बेबी शॉवर करण्यात आलं. यासाठी प्रसिद्ध शेफ चिनू वझे यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांची गोवा आणि मुंबई येथे केटरिंग कंपनी आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांना फॉलो करतात. कतरिना कैफनेही अनेकदा चिनू वझे यांच्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया दिली आहे. चिनू वझे यांनी त्यांचा फोटो स्टोरीवर शेअर करत लिहिले, 'आज कोणाच्या बेबी शॉवरसाठी केटरिंग ऑर्डर आली आहे ओळखा'. यावरुन सर्वांनीच कतरिनाच्या कैफच्या बेबी शॉवरचाच अंदाज लावला.
काही दिवसांपूर्वीच विकी आणि कतरिनाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. ब्लॅक अँड व्हाईट असा तो फोटो होता ज्यात कतरिना बेबी बंपवर हात ठेवून उभी होती. तर विकीही कौतुकाने पाहत होता. त्यांचा हा क्युट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील एका पॅलेकमध्ये त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. दोघांनी आजपर्यंत एकत्र एकही सिनेमा केलेला नाही. मात्र खऱ्या आयुष्यात ते प्रेमात पडले आणि त्यांनी थेट लग्न केलं. विशेष म्हणजे कतरिना विकीहून ५ वर्षांनी मोठी आहे.