कार्तिक आर्यनसोबत जोडलं नाव! अखेर मिस्ट्री गर्लने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली- "मी त्याची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:04 IST2026-01-07T10:01:30+5:302026-01-07T10:04:38+5:30

एका १८ वर्षांच्या चिअरगर्लसोबत कार्तिक आर्यनचं नाव जोडलं गेलं होतं. अखेर त्या तरुणीनेच ती कार्तिकला खरंच डेट करत आहे का? याविषयी मौन सोडलंय

Kartik Aaryan rumoured girlfriend karina kubuliyute talk about is she really dating | कार्तिक आर्यनसोबत जोडलं नाव! अखेर मिस्ट्री गर्लने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली- "मी त्याची..."

कार्तिक आर्यनसोबत जोडलं नाव! अखेर मिस्ट्री गर्लने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली- "मी त्याची..."

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक एका १८ वर्षांच्या 'मिस्ट्री गर्ल'ला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. मात्र, आता या तरुणीने स्वतः समोर येत या सर्व चर्चांवर मौन सोडले आहे. काय म्हणाली ती?

या चर्चांना पूर्णविराम देत करीनाने एका सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत स्पष्टपणे नाकारले आहे. तिने लिहिले, "I'm not his gffff!!!" (मी त्याची गर्लफ्रेंड नाही!). इतकेच नाही तर करीनाने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्येही बदल करत "मी कार्तिकला ओळखत नाही, मी त्याची गर्लफ्रेंड नाही, मी कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घ्यायला आली आहे'', असे लिहिल्याची माहितीही समोर आली आहे.

कोण आहे करीना कुबिलियूते?

करीना ही यूकेमधील एका कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती मूळची ग्रीक असून तिथे ती 'चीअरलीडर' म्हणूनही काम करते. तिचे वय साधारण १८ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. कार्तिक हा ३५ वर्षांचा असून तो आणि करीना यांच्यातील वयाच्या मोठ्या अंतरामुळेही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.या अफवा जोर धरू लागताच कार्तिक आर्यनने करीनाला इंस्टाग्रामवर 'अनफॉलो' केल्याचेही नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले. कार्तिकने अद्याप या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कार्तिक आर्यन नुकताच गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत होता. त्याने गोव्यातील बीचचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्याच दरम्यान, करीना कुबिलियूते नावाच्या एका परदेशी तरुणीनेही तशाच पद्धतीचे फोटो शेअर केले. दोन्ही फोटोंमधील बीच बेड, टॉवेल आणि बॅकग्राऊंड अगदी सारखेच होते. यावरून कार्तिक आणि करीना एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असून ते रिलेशनशिपमध्ये आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जाऊ लागला.

Web Title : कार्तिक आर्यन का नाम जुड़ा: मिस्ट्री गर्ल ने रिश्ते का सच बताया, अफवाहों का खंडन

Web Summary : कार्तिक आर्यन का नाम एक 18 वर्षीय लड़की से जोड़ा गया। करीना कुबिलियूते नामक लड़की ने स्पष्ट किया कि वह उनकी गर्लफ्रेंड नहीं है, और डेटिंग की अफवाहों का खंडन किया। वह यूके की एक छात्रा है और वर्तमान में परिवार के साथ छुट्टियां मना रही है। कार्तिक ने इंस्टाग्राम पर उसे अनफॉलो कर दिया है।

Web Title : Kartik Aaryan Linkup: Mystery Girl Clarifies Relationship Status, Denies Dating Rumors

Web Summary : Rumors linked Kartik Aaryan to an 18-year-old. The girl, Kareena Kubiliute, clarified she is not his girlfriend, denying the dating rumors. She is a student from the UK, currently vacationing with family. Kartik has unfollowed her on Instagram.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.