नेपोटिझमवर करण देओलची थेट प्रतिक्रिया; सनीच्या लेकाचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:05 PM2023-10-12T12:05:48+5:302023-10-12T12:06:08+5:30

Karan deol: करणने थेट वक्तव्य करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

karan-deol-made-a-big-statement-about-star-kids | नेपोटिझमवर करण देओलची थेट प्रतिक्रिया; सनीच्या लेकाचं वक्तव्य चर्चेत

नेपोटिझमवर करण देओलची थेट प्रतिक्रिया; सनीच्या लेकाचं वक्तव्य चर्चेत

 बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) सध्या त्याच्या गदर 2 या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६०० कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे त्याचा लेक राजवीर देओल याने 'दोनो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या या बापलेकाची जोडी सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यामध्येच आता सनीचा थोरला लेक करण देओल याने नेपोटिझम आणि स्टारकिड्स वर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

"स्टार किड्सला नेहमी टार्गेट केलं जातं. पण, स्टार किड्सवर एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर कायम असतं. मुळात फिल्मी फॅमिलीकडे लोकांचं जास्त लक्ष असतं. इतकंच नाही तर त्यांच्यावर टीका पण सगळ्यात जास्त होते", असं करण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "स्टार किड्सकडून खूप अपेक्षा केल्या जातात. लोक फक्त कधी संधी मिळते आणि आम्हाला कमीपणा दाखवायला मिळतो याच्याच शोधात असतात."

दरम्यान, करण देओलचं नुकतंच लग्न झालं आहे. करणसुद्धा सनीप्रमाणेच कलाविश्वात सक्रीय आहे.  पल पल दिल के पास या सिनेमातून करणने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सनी देओलने केलं होतं.

Web Title: karan-deol-made-a-big-statement-about-star-kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.