...आणि मध्येच हनीमून सोडून भारतात परतले काजोल आणि अजय देवगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 08:00 IST2018-08-28T17:53:51+5:302018-08-29T08:00:00+5:30
काजोल आणि अजय देवगण यांनी १९९४ साली एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. १९९९ साली ते दोघे विवाहबंधनात अडकले आणि या विवाह सोहळ्यात जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

...आणि मध्येच हनीमून सोडून भारतात परतले काजोल आणि अजय देवगण
अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांच्या लग्नाला वीस वर्षे झाली आहेत. ते दोघे १९९९ साली विवाह बंधनात अडकले होते. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर ते दोघे हनीमूनला गेले होते आणि टूर मध्येच सोडून ते दोघे भारतात परतले. का असे परतले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. याबाबत खुद्द काजोलने खुलासा केला आहे.
काजोल म्हणाली की, 'आम्ही दोन महिन्यांसाठी हनीमूनला गेलो होतो. मी अजयला लग्नाच्या आधीच एक अट घातलेली होती. मला हनीमूनला वर्ल्ड टूर करायची होती. आम्ही तिकिट बुक केले आणि ऑस्ट्रेलियावरून लॉस अँजेलिसला गेलो व तिथून लॉस वेगासला गेलो. त्यावेळी आम्ही ग्रीसमध्ये होतो. आम्हाला चाळीस दिवस झाले होते. अजय तोपर्यंत खूप थकला होता. एके दिवशी सकाळी तो उठला आणि म्हणाला की माझे डोके खूप दुखत आहे. जेव्हा मी अजयला म्हटले की मी काय करू शकते त्यावर तो म्हणाला की, घरी जाऊयात. त्यावर मी विचारले की डोकेदुखीसाठी टूर सोडून घरी जायचे आहे का तुला ? तो म्हणाला की मी थकलो आहे.' अशाप्रकारे ते दोघे हनीमून मध्येच सोडून घरी परतले.
काजोल व अजय देवगण यांनी १९९४ साली एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि पाच वर्षानंतर ते दोघे लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्न सोहळ्याला मित्र व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दोघांना न्यासा व युग अशी दोन मुले आहेत.