'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:08 IST2025-05-21T12:04:41+5:302025-05-21T12:08:29+5:30

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ' या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

Jurassic World Rebirth Official Hindi Trailer 2 Scarlett Johansson | 'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

Jurassic World Rebirth: 'ज्युरासिक वर्ल्ड' फ्रँचायझीतील सातवा भाग 'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ' या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची खूप काळापासून चाहते वाट पाहत आहेत. आता मेकर्सनी अचानक ट्रेलर रिलीज करत सर्वांनाच मोठा सरप्राइज दिला आहे.

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'मध्ये स्कारलेट जोहानसन ही जोरा बेनेट या भूमिकेत आहे. जी एका अंडरकव्हर मिशनसाठी निघालेली आहे. तिचं उद्दिष्ट आहे, जमीन, समुद्र आणि आकाशातील सर्वात भयानक तीन डायनासोर्सच्या डीएनएचे नमुने मिळवणे. कथेचा मुख्य भाग एका टापूच्या (island) भोवती फिरतो, जिथे पूर्वीचा जुना ज्युरासिक पार्क होता. जोरा बेनेटसोबत या मोहिमेत दोन महत्वाचे साथीदार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ' हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, 'ज्युरासिक' फ्रँचायझीची सुरुवात ३१ वर्षांपूर्वी जुरासिक पार्क (१९९३) चित्रपटाच्या रिलीजपासून झाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि तो हिट ठरला. त्यानंतर, या फ्रँचायझीचे पुढील चित्रपटही प्रदर्शित झाले आणि ते सर्व चित्रपट यशस्वी ठरले. १९९७ मध्ये 'द लॉस्ट वर्ल्ड: ज्युरासिक पार्क', २००१ मध्ये 'ज्युरासिकपार्क III', २०१५ मध्ये 'ज्युरासिकवर्ल्ड', २०१८ मध्ये 'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' आणि २०२२ मध्ये 'जुरासिक वर्ल्ड डोमिनियन' प्रदर्शित झाले. प्रत्येक चित्रपटाच्या यशामुळे, 'ज्युरासिक वर्ल्ड' या फ्रँचायझीला एक मोठा ग्लोबल फॅनबेस मिळाला आहे.

Web Title: Jurassic World Rebirth Official Hindi Trailer 2 Scarlett Johansson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.