'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:09 IST2018-06-20T13:07:30+5:302018-06-20T13:09:29+5:30
काहींना धडक चा ट्रेलर आवडला होता तर काहींनी सोशल मीडियातून या ट्रेलरची खिल्ली उडवली होती. त्यावर पहिल्यांदाच जान्हवीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी
मुंबई : येत्या 20 जुलैला जान्हवी कपूरचा 'धडक' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्यावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. काहींना 'धडक' चा ट्रेलर आवडला होता तर काहींनी सोशल मीडियातून या ट्रेलरची खिल्ली उडवली होती. त्यावर पहिल्यांदाच जान्हवीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, 'लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि मला आशा आहे की, ज्यांना ट्रेलर आवडला नाही, ते सिनेमा पाहून आपला विचार बदलतील. आधी ट्रोल केल्याने किंवा खिल्ली उडवल्याने काही फरक पडत नव्हता पण आता मी इंडस्ट्रीमध्ये आहे त्यामुळे या गोष्टींचा फरक पडतो'.
'धडक' हा सिनेमा मराठीतील सुपरहिट सैराटचा हिंदी रिमेक आहे. यात जान्हवीसोबत इशान खट्टर हा अभिनेता दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर काही प्रेक्षकांनी यावर जोरदार टिका केली होती. सैराटसोबत आणि त्यातील कलाकारांसोबत नव्या कलाकारांची तुलना केली गेली होती.