घटस्फोटानंतर कुशा कपिला स्टँडअप कॉमेडियनला करतेय डेट? रणबीर कपूरच्या चित्रपटातून केलायं डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:45 PM2024-04-19T13:45:05+5:302024-04-19T13:47:52+5:30

घटस्फोटानंतर कुशा कपिला पुन्हा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे.

Is Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi After Divorce With Zorawar | घटस्फोटानंतर कुशा कपिला स्टँडअप कॉमेडियनला करतेय डेट? रणबीर कपूरच्या चित्रपटातून केलायं डेब्यू

घटस्फोटानंतर कुशा कपिला स्टँडअप कॉमेडियनला करतेय डेट? रणबीर कपूरच्या चित्रपटातून केलायं डेब्यू

कुशा कपिला ही एक नावाजलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियनही आहे. कुशाने अभिनयाकडं मोर्चा वळवला असून शिल्पा शेट्टी स्टारर 'सुखी' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'मधून चाहत्यांच्या भेटीस ती आली. आता ती वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आलेली आहे.  लग्नाच्या सहा वर्षानंतर घटस्फोटानंतर कुशा कपिला पुन्हा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. कुशा ही लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियनला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कुशाला डेट करत असलेली ही व्यक्ती कोण आहे. तर या स्टँडअप कॉमेडियनने नुकतेच अभिनेता रणबीर कपूरच्या 'तु झूठी मैं मक्कार' सिनेमामधून बॉलिवूड डेब्यू केलाय. अर्थातच ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर अनुभव सिंग बस्सी हा आहे. अनुभव सिंग बस्सी आणि कुशा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

'रेडइट' या सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामुळे कुशा कपिलाच्या अफेरची चर्चा सुरु झाली आहे. त्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'फार जवळच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत,' अशा कॅप्शनसहीत रेडइटवर कुशा कपिला आणि स्टँडअप कॉमेडियनचा फोटो शेअर करण्यात आला आहे.  याआधी कुशाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आलं होतं. 

दरम्यान अनुभव सिंग बस्सी हा एक  प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. ज्यानं आपल्या स्टँड-अप कॉमेडीने लाखो लोकांचे मन जिंकले आहेत. तर कुशा कपिला ही जून 2023 मध्ये पती जोरावरअहलुवालियापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. कुशाने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. 
 

Web Title: Is Kusha Kapila Dating Comedian Anubhav Singh Bassi After Divorce With Zorawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.